*शंकरराव मोहिते महाविद्यालयात महिला व मुलींची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
संग्रामनगर दि.१५ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उपजिल्हा रुग्णालय आरोग्य समिती व आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिला व मुलींची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन डॉ.देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या ,”मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने व महत्त्वाच्या आजारांचे योग्य निदान करण्यासाठी अठरा वर्षावरील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे,या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले आहे. प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद दिले. याप्रसंगी अकलूज उपजिल्हा रुग्णालयातील तांत्रिक सहाय्यक सुंदर गायकवाड,लक्ष्मण चौगुले,संजना चव्हाण,सोनाली कोडलकर,आरोग्य सेवक पताळे,हिरवे सिस्टर,बागवान सिस्टर,आशा सुपरवायझर ओतारी मॅडम इत्यादी कर्मचा-यांनी सहभाग घेतला.या शिबिरात शंभर विद्यार्थ्यिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दत्तात्रय मगर यांनी केले डॉ.सविता सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.सज्जन पवार यांनी आभार मानले.








