माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्री विठ्ठलराव निवृत्तीराव गायकवाड यांची निवड.
अकलूज (प्रतिनिधी )
माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीविठ्ठल गायकवाड तर सचिवपदी श्रीआप्पा शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा कांतीलाल सांस्कृतिक भवनात जिल्हाध्यक्ष बसवराज मणुरे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत माळशिरस तालुका कार्यकारणीच्या निवडी मावळते अध्यक्ष श्री प्रद्युम्न गांधी यांनी जाहीर केल्या. यावेळी खजिनदारपदी अश्पाक मुलाणी, उपाध्यक्षपदी योगेश गांधी व रणजित महाडिक पाटील, संघटक सहसचिव जगदिश राजमाने व सुधीर कैमकर, जनसंपर्क अधिकारीपदी सतीश चव्हाण यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी बोलताना संघटनेचे नवीन अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड यांनी मा.श्री.जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष,ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) ,मा. श्री. मदनभाऊ पाटील (संघटक सचिव,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र), मा.श्री. विजय पांडुरंग पाटील (विद्यमान अध्यक्ष MSCPC), मा.श्री. बसवराज मणुरे (अध्यक्ष,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट), मा.श्री.सिद्धेश्वर घाळे (उपाध्यक्ष,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट) , मा. श्री. राजशेखर बारोळे (सचिव,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट), मा.श्री. राजेश विरपे (खजिनदार,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट) यांनी मला अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले . तसेच येत्या महिन्यात सर्व मेडिकल बांधवांसाठी त्यांच्या हक्काचे केमिस्ट भवन अकलूज याठिकाणी भाडेतत्वावर सुरू करणार असल्याचे सांगितले तसेच सर्व मेडिकल व्यावसायिक यांना मोफत एक्सपायरी पुस्तक देण्याचे जाहिर केले तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिक बंधुसाठी क्रेडिट सोसायटी स्थापन करण्याचे जाहीर केले.
यावेळी सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री बसवराज मनुरे यांनी नवीन कार्यकारिणी चे अभिनंद केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी गंगाधर कापसे, राजशेखर बारोळे, राजेश विरपे, प्रशांत खलिपे, राजेंद्रसिंह बोमरा, पांडुरंग वाघमोडे, राजन ठक्कर, व्यंकटेश पुजारी, सुरेश टेळे, कल्याणराव देवडीकर, अनिल वैद्य आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार आप्पा शेंडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास नितीन दोशी, शंकर पवार, अमोल आडगांवकर, विजय जगताप, प्रदिप भोरे, रवी जगताप, आनंद शिंदे,अमरसिंह गायकवाड, आनंद चव्हाण, अमोल जवंजाळ, विशाल मुंडफणे, शुभम पवार, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.













