• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा दिमाखात संपन्न –

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 13, 2022
in क्रीडा
0
प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा दिमाखात संपन्न –
0
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा दिमाखात संपन्न -**अकलूज – (प्रतिनिधी) –* कला, क्रीडा, सांस्कृतीक, समाजीक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आज रविवार दि. 13/11/2022 रोजी आयोजित केलेल्या बालक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिजामाता कन्या प्रशालेच्या सभापती मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले. सदरच्या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे सदर स्पर्धेसाठी प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, मा.श्री. दिपकराव खराडे-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मा.श्री. हर्षवर्धन खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री. महादेव अंधारे, खजिनदार मा.श्री. वसंत जाधव, सचिव मा.श्री. पोपट भोसले-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य मा.श्री. उत्कर्ष शेटे, प्रताप क्रीडा मंडळाचे सदस्य यशवंत माने-देशमुख, बिभीषण जाधव, राजेंद्र देवकर नंदकुमार गायकवाड, भानुदास आसबे, फिरोज तांबोळी, सुहास थोरात, विविध शाखेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. प्रारंभी प्रताप क्रीडा मंडळाच्या स्पर्धेचे उद्घाटन मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांचेहस्ते ध्वजारोहण करून झाले. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील व श्रीमती स्व. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महर्षी गीत ही सादर झाले. स्पर्धेच्या मैदानाचे पूजन मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले व स्पर्धेला प्रारंभ झाला. मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांनी सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी प्रस्ताविकात स्पर्धा प्रमुख शिवाजी पारसे म्हणाले, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाल मुलांच्या अंतरीक गुणांना व कौशल्यांना विकसित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये बालवयातच खेळाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती होऊन त्यांची योग्य वाढ व्हावी, आदी हेतूने या बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. १९७८ साली मा. बाळदादांनी स्थापन केलेल्या प्रताप क्रीडा मंडळाने अनेक कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवून व राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा राबवून देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. या बाल क्रीडा स्पर्धेत लहानगट (वय ४+) यांचेसाठी असणाऱ्या डोक्यावर चेंडू घेऊन पळणे २० मीटर या गटात ३२१ स्पर्धक, मोठा गट (वय ५+) यांचेकरीता धावणे ५० मीटर या गटात ३६८ स्पर्धक, इयत्ता १ ली (वय ६+) साठी कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे २५ मीटर यासाठी ४४२ स्पर्धक, इयत्ता २ री (वय ७+) लंगडी घालत जाणे ५० मीटर गटात ३२८ स्पर्धक, इयत्ता 3 री (वय ८+) साठी तीन पायांची शर्यत ५० मीटर गटात ४४० स्पर्धक व इयत्ता ४ थी (वय ९+) साठी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे ३० मीटर या गटात ३५० स्पर्धक असे मिळून एकूण ६ गटात १२१८ मुले व १०११ मुली अशी एकूण २२२९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रताप क्रीडा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेसाठी विविध समित्या नियोजनबद्ध कार्यरत होत्या. स्पर्धेसाठी ८ प्रशस्त मैदाने सज्ज होती. नियोजनबद्ध स्पर्धा पार पाडण्यासाठी विविध समित्या कार्यरत होत्या. प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सहभागी प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. सकाळपासूनच क्रीडा संकुलची गॅलरी पालकांनी व प्रेक्षकांनी गच्च भरली होती. बालकांचा व पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मंडळाच्या वतीने सर्व स्पर्धकांना खाऊ वाटपही करण्यात आले. स्पर्धेतील गटनुसार प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे – लहानगट – (मुली) – डोक्यावर चेंडू घेऊन पळणे या गटात प्रथम – कु. प्रार्थना चव्हाण, द्वितीय – आरोही पवार, तृतीय – कु. विनया मगर, (मुले) – प्रथम – हसनैन शेख, द्वितीय – हर्षद गुरळकर, तृतीय – अभिश्रेय मदने मोठा गट – (मुली) ५० मीटर धावणे या गटात प्रथम – कु. दुर्गा केमकर, द्वितीय – कु. योगी घोडके, तृतीय – कु. राजनंदिनी जाधव, (मुले) – प्रथम – निरंजन पवार, द्वितीय – तेज लावंड, तृतीय – श्रीराज महादार इयत्ता १ ली कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे (मुली) प्रथम – कु. तमन्ना खान, द्वितीय – कु. जुनेद मुलाणी, तृतीय – कु. आन्वेशा बनकर, (मुले) – प्रथम – आर्यन गमे, द्वितीय – मानव काटकर, तृतीय – श्लोक सरगर, इयत्ता २ री लंगडी घालत जाणे (मुली) – प्रथम – कु. श्रेया मदने, द्वितीय – कु. स्वरा वाळेकर, तृतीय कु. संस्कृती पोळ, (मुले) – प्रथम – सार्थक शिंदे, द्वितीय – शिवेंद्र भोसले, तृतीय – पृथ्वीराज कांबळे इयत्ता 3 री – तीन पायाची शर्यत (मुली) सर्व क्रमांक विभागूण प्रथम कु. राजनंदिनी दुपडे, कु. अंकिता काळे, द्वितीय – कु. साई थिटे, कु. धनश्री मंडलीक, तृतीय कु. श्रेया इंगळे, कु. माही साठे. (मुले) – सर्व क्रमांक विभागूण प्रथम – विहान मगर, तेजस गायकवाड, द्वितीय – शिवराज मगर, श्रेयस मगर, तृतीय – आदित्य भोसले, श्लोक खंडागळे. इयत्ता ४ थी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे (मुली) – प्रथम – कु. श्वेता कोडम, द्वितीय – कु. सायली गायकवाड, तृतीय – कु.अनुष्का शिंदे, (मुले) – प्रथम – मुजफ्फर गालीब, द्वितीय – सौरभ चव्हाण, तृतीय – प्रज्वल फलटणकर, यांचेसह अनेक उत्तेजनार्थ बक्षीसेही स्पर्धकांनी पटकावली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. सूत्रसंचलन किरण सूर्यवंशी व आर.आर. पाटील यांनी केले. प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते ध्वजावतरण करून स्पर्धेचा समारोप झाला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
भारत सरकार के प्रधानमंत्री आदर्श एडवाईजर कमेटी के सदस्य व सामाजिक न्याय विभाग मंत्रालय दिल्ली के सदस्य श्री कृष्णचंद्र सीसोदिया ने कीया महाराष्ट्र पुणे का दोरा*

भारत सरकार के प्रधानमंत्री आदर्श एडवाईजर कमेटी के सदस्य व सामाजिक न्याय विभाग मंत्रालय दिल्ली के सदस्य श्री कृष्णचंद्र सीसोदिया ने कीया महाराष्ट्र पुणे का दोरा*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In