• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

मोरोची आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना मा.राष्ट्रपती यांचे हस्ते सन्मानित.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 7, 2022
in महाराष्ट्र
0
मोरोची आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना मा.राष्ट्रपती यांचे हस्ते सन्मानित.*
0
SHARES
596
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*मोरोची आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना मा.राष्ट्रपती याचे हस्ते सन्मानित.*

संग्रामनगर दि.७ (केदार लोहकरे यांजकडून)माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातील सेविका श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव यांना भारताच्या राष्ट्रपती मा.दौपदी मुर्म यांचे शुभहस्ते राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाईटींगल पुरस्काराने नवी दिल्ली येथे आज सन्मानित करण्यात आले. मोरोची आरोग्य केंद्रात गेली १६ वर्ष राष्ट्रीय कार्यक्रम उत्कृष्ट राबविण्यात आल्याबद्दल त्यांना देशातील आरोग्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.यामध्ये बाल स्वास्थ, परिवार नियोजन अशा अनेक उपक्रात चांगले कार्य श्रीमती मनिषा जाधव यांनी केलेले आहे.त्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्रीमती मनिषा जाधव यांचे सर्व कुटुंब देशाची व रूग्णांची सेवा करत आहेत.त्यांचे पती भारतीय सैनिक दलात होते.त्यांचे निधनानंतर आपल्या एकुलत्या एक मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव हा देश सेवासाठी पाठविला आहे.सध्या तो गया(बिहार) येथे सैनिक प्रशिक्षण घेत आहे. मनिषा जाधव यांना देशातील हा सर्वच्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला आहे.अकलूजच्या जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

प्रवास गाथा आणि अल्प परिचय :

नाव. श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव. : आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र,मोरोची. उपकेंद्र धर्मपुरी. ता. माळशिरस . जि. सोलापूर पिन .४१३१०९.श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव मागील 18 वर्षे पासून आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून आरोग्यसेवा अविरतपणे निभावत आहेत. आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना “राष्ट्रीय फोरेन्स नाईटींगल पुरस्कार 2021 ” या सर्व उत्कृष्ठ पुरस्काराने आपल्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. १२ मे १८१० हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका मंहून आरोग्य सेवेत घालवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्या दिन ” मंहून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकार द्वारे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस “फ्लोरेन्स नाइटिंगेल” यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्य पुरस्कार बहाल केला जातो.आरोग्यसेवेतील चांगले काम पाहून श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव यांची नुकतीच देशपातळीवरील दिला जाणारा “नॅशनल फ्लॉरेन्स नाइटीनगेलं पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली होती आणि आज हा पुरस्कार राष्ट्रपती यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये सन्मानपत्र, मिडल आणि रोख रक्कम 50 हजार रुपये देवून गौरवण्यात आले. ग्रामीण भागातून शिक्षण घेवून आपल्या उत्कृष्ठ कामातून राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र होणे ही बाब खर तर सोलापूर जिल्ह्यासाठी साठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रथमच आरोग्य विभागातून सोलापूर जिल्हा मधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या गुरसाळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या जन्मगावी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कामा आणि अल्बलेस रुग्णालय मुंबई या ठिकाणावरून 18 महिन्याचे ANM चे प्रशिक्षण 2002 ला पूर्ण केले. त्यानंतर महानगरपालिका सोलापूर येथे आरोग्य विभागामध्ये 2003 ते 2004 दरम्यान आरोग्यसेविका या पदा वरती काम केले. त्यानंतर 2005 दरम्यान त्यांची निवड जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडून आरोग्यसेविका या पदासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी, तालुका माळशिरस या ठिकाणी करण्यात आली आणि आज त्या प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची, उपकेंद्र धर्मपुरी जिल्हा सोलापूर याठिकाणी कार्यरत आहेत. आरोग्यसेवेतील काम करत असताना त्यांनी स्वतःचे पुढील शिक्षण चालू ठेवले. आज त्यांनी पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीतर शिक्षण चालू ठेवले आहे. त्याशिवाय कामा आणि अल्बालेस रुग्णालय मुंबई याठिकाणी 2017 दरम्यान आरोग्य सेवेतील LHV चे 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्याठिकाणी 7 जिल्हा मधून प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्या. त्याशिवाय त्या करत असलेल्या आरोग्यसेवेतील चांगल्या कामामुळे अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना तालुका पातळीवरती २०१३ आणि २०१४ मध्ये “कुटुंब-नियोजन शस्त्रक्रिये”मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सलग दोन्ही वर्षे “प्रथम क्रमांक” मिळाल्याचे प्रमाणपत्र त्यावेळेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम कासार यांचे हस्ते देण्यात आले होते. त्यांनी २०१७ मध्ये “जननी-सुरक्षा योजना” शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याने तालुका पातळीवरती त्या करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आला होता. त्यासाठी चा पुरस्कार त्यावेळेचे सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधीकारी श्री राजेंद्र भारूड यांचे हस्ते प्रधान करण्यात आला होता. त्याशिवाय १२ मे २०१८रोजी उत्कृष्ट कामाबद्दल “कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय मुंबई” यांचे तर्फे दिला जाणारा “आदर्श परिचारिका” हा पुरस्कार देण्यात आला होता. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्या करत असलेल्या कामाच्या ठिकाणी “ग्रामपंचायत धर्मपुरी” यांचे वतीने झेंडा वंदनाचा मान देऊन कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाचा सन्मान केला गेला. कोरोना काळामध्ये एका दिवशी ४३२ कोरोना टेस्ट आणि तीन दिवसामध्ये ११०० कोरोना टेस्ट केल्या गेल्या होत्या त्याबद्दल “प्राथमिक आरोग्य अधिकारी” मोरोची चे वैदयकिय अधिकारी डॉ. मेहता साहेब यांचे कडून चांगल्या कामाची प्रशंसा केली गेली होती. त्याशिवाय त्या अनेक सामजिक कार्यात भाग घेत असतात.दरवर्षी 1 मे रोजी चे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनेक सामाजिक संस्थांना काही ना काही मदत करत असतात. ज्या मध्ये गरजू-गोरगरीब, अंध-अपंग शाळा, सामाजिक-शैक्षणिक संस्थांना वस्तू रूपाने अथवा आर्थिक मदत करत असतात. त्यांचे पती कै.भाऊसाहेब जाधव यांनी देशाच्या सीमेवरती आर्मी मध्ये सेवा केली होती. त्याशिवाय त्यांचा कारगिल युद्धामध्येही सहभाग होता .आपल्या मुलाने ही देश सेवा करावी यासाठी त्याची डिफेन्स मध्ये निवड होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. नुकतीच त्यांचा मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव याची वयाच्या १९ व्या वर्षी डिफेन्स मधील SSB (TES ) कोर्स-४७ batch मधील Interview मध्ये निवड झाली आहे. जो आशिया खंडातील सर्वात अवघड interview समजला जातो आणि आज त्यांचा मुलगा भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट या पदावरती बिहार मधील OTA GAYA या ठिकाणी पुढील प्रशिक्षण घेत आहे.तरी आरोग्यसेवेतील उत्कृष्ट कामासाठी देशभरा तून प्रत्येक राज्यांमधून या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या पदावरील 51पुरस्कारविजेते निवड करत असताना आपल्या महाराष्ट्र राज्यातून ANM म्हणुन श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांची निवड करण्यात आल्या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा यांच्यावतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल व्हावा म्हणून अकलूज पोलीस स्टेशन येथे निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा यांच्यावतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल व्हावा म्हणून अकलूज पोलीस स्टेशन येथे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In