महर्षी संकुलात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल याच्या जयंती निमित्त एकता दौड..
शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेत लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती व पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी याची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सरदार वल्लभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणारे योगदान याविषयी मार्गदर्शन केले .प्रतिमा पूजन केंद्र प्रमुख नष्टे साहेब व मुख्याध्यापक फडतरे याच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे महर्षी संकुलातील स्काऊट गाईड, एन सी सी ,आर एस पी ,खेळाडू व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहभागी होऊन एकता दौड हा उपक्रम संपन्न केला एकता दौड महर्षी संकुल शिवरत्न बंगला ,शिवपार्वती मंदिर ते महर्षी संकुल मार्गावरती करण्यात आली कार्यक्रमास प्रशाला समिती सभापती अॅड. नितीनराव खराडे प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,विनोद जाधव ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे ,पर्यवेक्षक अंकुश एकतपूरे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एकता दौड मध्ये महर्ष संकुलाचे 478 विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमा बद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी सर्वाचे कौतुक केले कार्यक्रमास बिभीषण जाधव, भारत चंदनकर,भारत जाधव,गणेश जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन व नियोजन किरण सुर्यवंशी यांनी केले.











