*मेडद येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत बनली धोकादायक* *शाळेची नवीन इमारत कधी होणार याकडे सर्व ग्रामस्थ आणि पालकांचे लक्ष लागले**
सदाशिवनगर प्रतिनिधी**मेडद तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद**ग्रामीण भागात असणारी शाळा ही ग्रामीण भागाची मूलभूत गरज आहे आणि या गोष्टीवर प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही या मेडद गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झालेले असून या शाळेमध्ये सर्व गावातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिकणारी मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत खूप वर्षांपूर्वीची ही इमारत असून या इमारतीला गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी नव्हे तर गेल्या दहा वर्षापासून डागडुजीची गरज असून आता ही इमारत पडण्याच्या मार्गावर आहे…. या मराठी शाळेमध्ये एकूण साडेतीनशे विद्यार्थी शिकत आहेत त्यामध्ये 200 मुलं 150 मुली अशी संख्या विद्यार्थ्यांची आणि दहा शिक्षक वर्ग आणि अनिल साने गुरुजी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत तरी हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग खूप रिस्क घेऊन त्यांचं कर्तव्य करत आहेत या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष घालणं गरजेचं असून कुठलेही नियोजन दिसत नाही… त्याचप्रमाणे या शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधांची सुद्धा खूप मोठी कमतरता आहे… शाळेमध्ये गावातील काही तरुण वर्ग या अवस्थेची पाहणी करत असताना सर्व शिक्षक वर्गाने सुद्धा त्यांच्या व्यथा अतिशय प्रामाणिकपणे मांडल्या त्यांच्या व्यथा खूप भयंकर आहेत या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष नाही आणि या शाळेचे काय होणार असा या शिक्षक वर्गाला सुद्धा पडलेला प्रश्न खूप मोठा आहे* *एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला पडलेला हा प्रश्न आहे की जबाबदार कोण? या गोष्टीवर प्रशासन व्यवस्थेने लवकरात लवकर तोडगा काढावा या विषयाची तक्रार संबंधित प्रशासन कार्यालयाकडे आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडे दोन दिवसांमध्ये माहिती सादर करणार असल्याची माहिती गावातील सर्व युवक वर्गाने दिलेले आहे.









