*अकलूज येथे स्वस्त धान्य दुकानात शिधा किट वाटपाचा शुभारंभ.*
संग्रामनगर दि.२५ (केदार लोहकरे यांजकडून)राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे १०० रुपयात शिधा वाटपाचा वितरणाला अकलूज येथे सुरुवात झाले असून या आनंदाचा शिधा किटमध्ये एक किलो साखर,एक किलो रवा,एक किलो चणाडाळ,एक लिटर पामतेल या चार वस्तूचा शिधा संचाचे अंत्योदय व प्रधान्य कुटुंब योजनातील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिनिधीक स्वरूपात वाटप सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांचे शुभ हस्ते करण्यात आले.तिन रेशन दुकानमध्ये एकूण ९४० कीट वाटप करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची या योजनेची पूर्ण माहिती जिल्हाध्यक्ष श्री मुख्तार भाई कोरबू यांनी सांगून ते पुढे म्हणाले कि,राज्यातील ७ कोटी शिधापत्रिकाधारकांना सदर निर्णयाचा लाभ असून मिळणार असून त्यांची दिवाळी सणचा आनंद वृद्धिंगत झाला आहे.दिवाळीच्या या विशेष भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले. अकलूजमधील स्वस्त धान्य दुकान सोसायटी १ दुकान नं ६१ रामायण चौक.चालक ओंकार राजेंद्र चंदनशिवे,स्वस्त धान्य दुकान सोसायटी २ दुकान नं ६२ चालक लक्ष्मण सदाफुले अकलाईनगर,स्वस्त धान्य दुकान सोसायटी ३ दुकान नं ६३ गणेशनगर चालक तेजस लांडगे या दुकानात शिधा किटचे वाटप करण्यात आला. यावेळी भाजप शहर अध्यक्ष महादेव कावळे.डाॅ.अक्षय वाईकर व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








