🍁🍁दिपावलीचा शूभ संदेश 🍁🍁🌹🍁🍁
महाराष्ट्र पाेलीस गेल्या ६ ते ७ दशकापासून संबध महाराष्ट्राची सूरक्षा सतत करीत आलेले आहे …पूढेही करीत राहतील ..🍁🍁या सात दशकांत या खाकीने प्राणांची बाजी लावून समाजाचं ..देशाचं आणि जनतेचं रक्षण केलं आहे ..जीवानिशी गेले …हे कर्तव्य हाेतं त्यांनी केलंय ..ईमानाने …🍁🍁या सात दशकांत महाराष्ट्र पाेलीसांनी समाजातील गून्हेगारी दहशतवाद ,संघटीत गून्हेगारी,जातीवाद,राजकीय वादावादी, जातीय दंगली,जातीय तेढ, पाहीलेत …अनेक अनेक वेळा जिंकले …अनेक वेळा हरले सगळं बराेबर व याेग्य असूनही …अनेक वेळा सून्न झाले …उदास झाले ..दू:खी झाले ..पण मनाने खचले नाहीत …हे मात्र खरं 🍁🍁 पाेलीस हे नाव एका व्यक्तीभाेवती केंद्रीत नाही संपूर्ण दल …पाेलीस दल असाच अर्थ असताे परंतू अनेकांनी ते पाेलीस नाव स्वत:भाेवती केंद्रीत करून समाजाशी गून्हेगाराशी टक्कर दिली कायदयाचा पक्का आधार व वापर करून अनेक गून्हेगार जेरबंद केलं … यात पांढरपेशा राजकीय गून्हेगारही हाेते ..काही अतिरेकी दहशतवादीही सह बाँम्बस्फाेट करणारेही हाेते,..मास्टरमाईंडही हाेते काही सिरीयल किलर ते फ्राॅड व गेमाडपंथीही हाेते आणि मल्टीपर्पज पर्सन्लीटीचे गून्हेगार ही हाेते …ही किमया राज्यातील अनेक पाेलीस अधिकारी व कर्मचारी केलेली हाेती …अनेकांचं एनकांउंटर हाेतं तर काहीजणांची जन्मठेप व फाशीही हाेती ….🍁🍁 पाेलीस स्टेशन हजेरी ते बंदाेबस्त जयंत्या गून्हेतपास करून काेणतीच वेळेवर सूटया न भाेगता शरीराबराेबर मन आणि मेंदू तंदूरूस्त कसा ठेवायचा ही कसरत मात्र तपास अधिकारीच करताे मग ताे पाेलीस नाईक असाे वा मान्यवर पाेलीस अधिकारी असाे …पण अनेक वर्ष जिंकत आलाय ..जिंकलाय ती निकाेप मानसिकता व कणखर बाणा आहे म्हणूनच …🍁🍁 आजही ताे गून्हेगारी विरूध्द तपास अधिकारी (Investigation Officer ) जिंकताेय पण …..गेल्या दाेन दशकापासून यात प्रचंड अडथळे येत आहेत … फिर्याद ते चार्जसीट मान्यवर काेर्टात दाखल करेपर्यंत अनेकांशी नमूनेबाज ईरसाल व मूरब्बी लाेकांशी संबध येताे …कधी फिर्यादी ईमानदार तर कधी अगाव व खाेटे बाेलणारा किंवा दि़शाभूल करणारा किंवा वेडयाचं साेंग घेणारा तर कधी अल्पवयीन असताे …कधी अराेपीच खतरनाक असताे प्रचंड त्रासदायक व डाेकेदूखी कणारा किंवा राजकीय गाेठयातला असताे …कधी आजारपणाचे सांग करणारा तर कधी हल्ला करणारा ,कांगावा करणारा असताे …कधीच न मिळून येणारा …अशावेळी गून्हे काढणासाठी वरीष्ठांचा तगादा वेगळाच ,काही ठराविक पाेलीसच तपास करणारे ,काहीनी काही कारणे सांगून दडी मारलेली …पगार तर सारखीच पण हा मानसिक व शाररीक त्रासतपास करणा-या पाेलीसालाच का ? किमान सरकारने पगार तरी जास्त वाढवून दयावी असं मनाेमन वाटतं पण पण ते मनातंच राहतं …अबाेल मनाेगत…🍁🍁🍁तपासात कठाेरपणा खाजगी जीवनात नेहमीच त्रासदायक ठरताे …याचा अनूभव अनेक वेळा पाहण्यात येताे …समाजात कठाेर पाेलीस चालत नाहीत …नावं ठेवतातं ….एकदम नाँर्मल राहीलं तर गून्हेगारावर वचक कसा राहील …चेष्टेचा विषय हाेताे …आपलं बाेलणं कूणी सिरीयसली कूणी मनावर घेत नाही …तपासात मूल्यमापन शून्न हाेतं …म्हणून काही तपास अधिकारी यांनी यातूनच चार पैसे कमाई करावी कशाला स्वखर्चाने झेराँक्स ,पेट्रेालपाणी , चहापाणी तासनतास दिलेला वेळ व दिलेली सवलत म्हणून काही ताेकडा प्रयत्न केला आणि नाेकरीवर घाव बसला काहीवर काही न करता अराेप आले …सगळं खरं असूनही …चाैकश्या व शिक्षा …पूरावे देवूनही असं कसं नेहमी मनात वाटतं …पण हे मनातचं …🍁🍁सरकारी दरबारी व विभागात सगळयात जास्त शिक्षा जर मिळत असतील तर पाेलीसांनाच मिळतात …पाेलीस अधिकारी कमी पण कर्मचारीच जास्त असतात …ईतर विभागात हा प्रकार दिसून येत नाही …ऐवढी शिक्षा देवूनही जर गून्हे घडतच असतील आणि पेंडींगच राहत असतील तर मग प्रशासन कसं ? नेहमी मिडीया,राजकारण,जनता,व सामान्य माणूस हा समाधानी नाहीच …..कायम तक्रार आहेच …तक्रार करून पाेहाेच घेवून आनंदी सण वार साजरा करताेय …साेबत अराेपी आणि फिर्यादीही …आणि पाेलीस मात्र तपास करून पेंडींग आहे म्हणून परेशान ….सत्य आहे पण बाेचरं आहे …शल्य आहे पण सल आहे मनात …यात काेणताही एक घटक जबाबदार नाही परंतू समाजरचनाच अशी झालीय की , …..प्रत्येकाला पैसा पाहीजे …ईझी मनी हवाय …ताेही दरमहीना …..गरज म्हणून नाही तर अँश करण्यासाठी मजा करण्यासाठी …बरं पैसासाेबत मानसन्मानही हवाय …मला पाेलीस घाबरले पाहीजे ..सलाम केला पाहीजे …मी काही केलं तरी …गप्प बसले पाहीजे …काहीची तरी अशी धारणाच आहे …पाेलीस आमच्या खिशातच आहेत….आणि हा सामना व चर्चा फक्त कर्मचारी वर्गाला सहन करावी लागते …पण सांगायचं कूणाला …सहन करताे…कधी राग येताे ..राग काढताेही …पण संयमानेच ..🍁🍁सहा ते सात दशकांत पाेलीस दलासमाेर एकंदरीत बदलता समाज ,बदलते राजकारण आणि राजकारणी …आणि राजनिती ..बदलती समाजमने व समाज निती..नवीन गून्हेगारी ..नियम गून्हेगार..नवीन पध्दती …त्यातून पाेलीसांना दिलेली तपासाची नवीन आॅनलाईन पध्दती पहाता …सायबर गून्हेगारी व लाेकेशन ट्रेस माेबाईल आँनलाईन फ्राॅड व घटनास्थळ नसलेले व अज्ञात अराेपी राज्य आणि देशाबाहेरचे गून्हे असतील …या समन्वयाने आता मान्यवर न्यायलयीन न्यायधिशांची संख्या कमी आहे ती वाढून जर पूर्तता झाली आणि न्यायप्रणाली मध्येही नवीन बदल..हाेणे अपेक्षीत आहे असं वाटतं …बाकी …पाेलीस दलाची अपूरी संख्या,राहण्याची घरे,आराेग्यसेवा,पदाेन्नती बदल्या ,अपरीपूर्ण व जूने बांधकाम असलेले पाेलीस स्टेशन व चाैक्या, नादूरूस्तईमारती,पाेलीसांचे भत्ते,बीले व मिळणारे रजा व प्रत्यक्ष दिल्या जाणारे रजा खांत्या अंतर्गतगटबाजी,असंताेष या सर्व बाबी पाेलीसांच्या काैटूंबिक बाबी अडचणी पूढे गाैन वाटत असले तरी साेडविणे गरजेचे आहेत असंच वाटतं 🍁🍁🍁चाेवीस तास काम करणा-या या समूहाला आता शिस्ती बराेबर नेत्रत्वाचीआणि सरकार बराेबर समन्वयाची गरज आहे ..प्रश्नात अडकून रिटायरपर्यंत ताे सूटलाच नाही …असं हाेवू नये किंवा बेईमानीचा किंवा बदनामीचा डाग चाैकशीत निष्पन्न हाेवून न्याय तरी लवकर मिळावा असं मनाेमन वाटतं …मग एका कणखर समन्वक किंवा नेत्रत्व हक्काचं असावं असं वाटणं का चूकीचं आहे ? यासाठी काही माेर्चा उपाेषणाची गरज नाही …शिस्त संयम कायदा पाळून सरकारशी बाेलणयातून समन्वय करायला आपलाच खाकीतील बांधव पाेहच करणे ही जबाबदारी आहे सर्वांची …असा बांधव असावा जाे कायदयाचा अभ्यासक व संपूर्ण माहीतीचा असावा ..🍁🍁🍁🌹🍁
रमेश सूरवसे पाटील आपली माणसं आपला परीवार







