• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

ऑनलाईनमुळे दिवाळी, माणसंही बदलली……….. प्रा. तात्यासाहेब काटकर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 23, 2022
in महाराष्ट्र
0
ऑनलाईनमुळे दिवाळी, माणसंही बदलली……….. प्रा. तात्यासाहेब काटकर
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऑनलाईनमुळे दिवाळी, माणसंही बदलली…..

शरदऋतूच्या मध्यावर आश्विन आणि कार्तिक यांच्या संधीकाली दशदिशा उजळून टाकणारी दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा, आनंदाचा, समाधानाचा, समृद्धीचा उत्सव म्हणजे दीपावली. दिन दिन दिवाळी…गायी म्हशी ओवाळी, म्हणत लहानपणी अगदी पहाटे दिवाळीला फटाक्यांच्या आवाजात सुरुवात व्हायची. खरं तर नरक चतुर्दशीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करायचे. अर्थात आईने सर्वांच्या अंगाला अगदी घासूनपुसून उटणं लावून द्यायची परंपरा होती. मग घरात कितीही माणसं असोत. आई प्रत्येकाला उटणं लावल्याशिवाय आंघोळ करू द्यायचीच नाही. त्यानंतर पटापट तयार होऊन बाहेर फटाके फोडायला जायची. त्यानंतर घरात सगळ्यांनी जमून एकत्र फराळ करण्याची मजाच वेगळी, नातेवाइकांच्या घरी फराळ देण्यासाठी जायाचे, मात्र आता हे कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. अर्थात दिवाळीचा जोषजल्लोष तसाच असला तरीही आताची दिवाळी कुठेतरी डिजीटल युगातील ऑनलाईन वाटते. शहरामध्ये तर ही जास्तच पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये शहरात व खेड्यात रुजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळीनिमित्त सजणार्‍या बाजारामध्ये एक प्रकाराने भरच घातली आहे व त्यात ऑनलाइन दुकानाची गर्दी व खरेदीची भर. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षा आता ऑफिसच्या वेळ सांभाळत किंवा घरूनच ऑनलाईन शॉपिंगला ग्राहक जास्त पसंती देऊ लागले आहेत. विशेषतः पूर्वी आईवडील दिवाळी आली की, आपल्या मुलांना बाजारात घेऊन त्यांना आवडतील ते कपडे अथवा इतर गोष्टी घेऊन देत असत. त्यानिमित्ताने पूर्ण कुटुंब खरेदीला जात होते. पण आता हे चित्र फारच कमी प्रमाणात दिसते आहे. विशेषतः तरुण वर्ग ऑनलाईन शॉपिंग जास्त करताना दिसतो कारण विशेष आकर्षक सूट दिल्यामुळे बाजारामध्ये फिरून शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे.आज प्रत्येक जण कामामध्ये इतका व्यग्र झाला आहे की, घरच्यांना सणासुदीच्या वेळीही वेळ देणे आता काहीसे अशक्य होऊ लागले आहे. खरे तर घरच्यांसाठी वेळ काढणे यासारखे मोठे गिफ्ट नाही. पण बाजारातील वस्तू आणून गिफ्ट देणे लोकांना आता जास्त महत्त्वाचे वाटायला लागले असून वेळ देणे तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही. शेजारी-शेजारी व एका घरातील भावंडे एकत्र जमून कंदील तयार करणे किंवा पणत्यांना रंग देणे अशा गोष्टींना महत्त्व देत असत. पण आता इतके पर्याय शहरांमध्ये उपलब्ध झाले आहेत की, पैसे देऊन वेळ वाचवण्याच्या नादात लहानसहान गोष्टीतील आनंदाला मात्र लोक मुकत असल्याचे चित्र आहे.  बाऊलमध्ये मेणाचे दिवे, अ‍ॅल्युमिनियमच्या लहान वाट्यांच्या पारंपरिक दिव्यांबरोबच मेणाचे दिवेदेखील आपल्याला दिसतात. असे सगळे पर्याय असल्यामुळे पूर्वीप्रमाणे अशा गोष्टी बनविण्यामध्येही लोकांना वेळ घालवणे आवडेनासे झाले आहे. पर्यावरणाबद्दलची जागरूकतेची ऐशीतैशी. ध्वनीप्रदूषणाबाबतची मर्यादा ओलांडून सगळ्यामुळे दणदणीत आवाजाचे सुतळी बॉम्ब, लवंगी माळा, रॉकेट यासारखे फटाके वाजतात. आतातर आकाश उजळवून टाकणार्‍या विविधरंगी फटाक्यांची मागणी जास्त प्रमाणात केली जाते. ध्वनीप्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चीडचीड, मानसिक ताण, श्रवणदोष इत्यादी दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडालेल्या फटक्याने निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध रुग्ण यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. अनेक पशुपक्षी घाबरून सैरावैरा पळताना मृत्युमुखी पडतात. वाहन चालवणारी माणसे दचकून अपघात होतातघरासमोर रांगोळी काढण्यासाठी एवढा वेळ का म्हणून ओरडा ऐकण्याची मजा वेगळीच होती. त्यामध्ये असणारी काळजी, आश्चर्य हे सगळे भाव एकत्र समेटून जायचे. मात्र आता वेळेअभावी रांगोळीच हरवली आहे. मोबाईलमुळे दूरचे लोक जवळ आल्याचे म्हटले जाते, पण वास्तविक जवळचे लोक मोबाईलमुळे दूर जात आहेत अशीही स्थिती सध्या दिवाळीसारख्या सणांमध्येही दिसते. पूर्वी ग्रीटिंग तयार करून एकमेकांना दिली जात होती. आता दिवाळीच्या आगोदर पासूनच मोबाईल वर धडाका उठला आहे. कोणताही सण असो दारावर विविध प्रकारच्या तोरणांना मागणी होती. घराबाहेर तोरण लावणे हे सणासुदीचे लक्षण समजले जायचे. दिवाळीच्या वेळी घरी कंदिलाबरोबर तोरण हमखास लावण्यात यायचे. विकत नाही घेतले तर बर्‍याच घरांमध्ये झेंडूची फुले आणून घरी तोरणे तयार करण्यात येत असत. पण आता या खर्‍या फुलांची जागा बर्‍यापैकी नकली आणि चायनीज तोरणांनी घेतली आहे. रेडीमेड फुलांची तोरणे तयार झाल्यामुळे त्याच्यातला ताजेपणा निघून गेला आहे. दिवाळी म्हटली की, फराळ हा पारंपरिकच असायला हवा अशी धारणा होती. त्यामध्ये चिवडा, लाडू, चकली, करंजी, अनारसा यासारख्या फराळांना प्राधान्य होते. पूर्वी फराळाचे पदार्थ हे दिवाळी या सणाचे औचित्य साधूनच बनवले जात होते. मात्र आता या फराळाची जागा बर्‍यापैकी कुकीज आणि कपकेक्स यासारख्या नव्या पदार्थांनीही घेतली आहे. अर्थात पूर्वीच्या फराळाला कधीही नकार मिळणार नाही. आताच्या लहान मुलांना आवडतील असे पदार्थ आता जास्त प्रमाणात दिसू लागले आहेत. घरात फराळ करायला वेळच नाही. त्यामुळे बाजारात जाऊन दिवाळीच्या एक दिवस अगोदर स्टाॅलमधून सर्व विकत आनले जाते. दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव, या प्रकाशाचा वापर आपल्या व्यावसायवृद्धीसाठी करण्याची संधी भांडवली बाजार कसा सोडेल. जुनं ते सोनं म्हणणं आता निकालात निघालंय. पुढच्या पाच दिवस वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने मोबाईल फोन्सच्या दिवाळी ऑफर्सच्या जाहिरांतींनी भरून जातील. छोट्या पडद्यावर छान छान दिसणारी जोडपी एखाद्या उत्पादनाची जाहिरात करून दिवाळीच्या शुभेच्छा देतील. हिंदी मराठी सर्वच मालिकांमध्ये स्पेशल दिवाळी एपिसोड्स दाखवले जातील. दिवाळी बदलली हे खरंच…पण मनातला आणि माणसांच्या नात्यातला फराळाचा गोडवा तस्साच ठेवायला हवा. त्यात बदल व्हायला नको…….

. प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.  शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
मोहिते पाटील परिवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे अकलूज मध्ये होणार अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक धनगर समाजाने मानले मोहिते पाटील परिवाराचे आभार.

मोहिते पाटील परिवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे अकलूज मध्ये होणार अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक धनगर समाजाने मानले मोहिते पाटील परिवाराचे आभार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In