कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर… अध्यक्षपदी डॉ.श्यामप्रसाद पावसे , सचिवपदी डॉ.श्रीकांत लगंडे यांची निवड.
..कोल्हापूर… होमिओपॅथीचे नेते डॉ.अरूण भस्मे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.यावेळी डॉ.श्यामप्रसाद पावसे यांची जिल्हाध्यक्ष, डॉ.शितल पाटील उपाध्यक्ष, डॉ.जयवंत पाटील उपाध्यक्ष (ग्रामीण), डॉ. श्रीकांत लंगडे सचिव, डॉ. मनोज भोपळे खजिनदार, सदस्य डॉ. किरण खोराटे, डॉ. श्वेता शहा, डॉ. प्राची महाजन, डॉ. सरोज नेजदारकोल्हापूर शहर -डॉ. दौलत खोत – अध्यक्ष, डॉ. सागर बचाटे – उपाध्यक्ष, डॉ. विरधवल मोरे – सचिव, डॉ. शशिकांत पाटिल – खजिनदारशाहूवाडी तालुका -डॉ. गजानन पाटिल – अध्यक्ष, डॉ. अमृत यमगर – उपाध्यक्ष, डॉ. ओंकार आंबीके – सचिवपन्हाळा तालुका -डॉ. ज्योतीराज गायकवाड – अध्यक्ष, डॉ. विशाल सावंत – उपाध्यक्ष, डॉ. शिवप्रसाद पाटिल – सचिवहातकनंगले तालुका -डॉ. सागर माने – अध्यक्ष, डॉ. नितीन मगदूम – उपाध्यक्ष, डॉ. चेतन हेरले – सचिवकागल तालुका -डॉ. अजय चिखलीकर – अध्यक्ष, डॉ. संजय बेनाडे – उपाध्यक्ष, डॉ. सतिश काटकर – सचिवगडहिंग्लज तालुका -डॉ. नरेंद्र पाटिल – अध्यक्ष, डॉ. सत्यजित देसाई – उपाध्यक्ष, डॉ. विलास कळेकर – सचिवशिरोळ तालुका..डॉ. अजित कदम अध्यक्षडॉ.योगिता पवार उपाध्यक्षडॉ.वैभव जोशी सचिव महिला विंग -डॉ. प्रिया दंडगे – अध्यक्ष, डॉ. स्नेहल पाटिल – उपाध्यक्ष, डॉ. प्रियांका कवाळे – सचिव, डॉ.मोनाली सुभेदार – खजिनदार, डॉ. अर्चना हांडे – जिल्हा समन्वयक यांच्या नेमणुका करण्यात आल्या.प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष डॉ.श्यामप्रसाद पावसे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांना सन्मानाने जगता यावे व त्यांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी होमिओपॅथीचे नेते डॉ.अरूण भस्मे सरांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथिच्या प्रचार,प्रसार व संशोधनासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना संघटीत करून भविष्यात होमिओपॅथिक औषधोपचार शिबिराचे आयोजन, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी होमिओपॅथी शास्त्र हे लोकाश्रयावर टिकून असून राजाश्रयासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांनी संघटित होणे काळाची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांची आदरणीय डॉ.अरूण भस्मे सरांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र मोट बांधण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीधर पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत होमिओपॅथिक डॉक्टर्स हे विखुरलेल्या स्वरुपात होते ते डॉ.अरूण भस्मे सरांच्या मार्गदर्शनाखाली एकवटलेले पहावयास मिळत असून त्यांचा होमिओपॅथिक डॉक्टरांना नक्कीच फायदा होईल असे सांगितले.वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.सदिप पाटील यांनी होमिओपॅथिच्या विकासासाठी शासन दरबारी दबाव आणण्यासाठी डॉ.अरूण भस्मे सरांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील आमरण उपोषण असेल, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी आम्ही यापूर्वी शहरातील डॉक्टर्स सहभागी होत होतो, परंतु जिल्हातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांची मोट बांधून एकसंध ठेवण्यासाठी आम्ही संघटनेत सहभागी आहोत असे सांगितले.यावेळी मा.प्राचार्य डॉ. जे.एस.पाटिल, डॉ. बी.पी.पाटिल डॉ. संजीव मुजुमदार, डॉ. किरण खोराटे, डॉ. जयवंत पाटिल, डॉ. सुप्रिया दंडगे यांनी मनोगते व्यक्त केली व संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ.श्रीकांत लगंडे तर आभार डॉ.शितल पाटील यांनी मानले.


































