सफेद काठी दिनानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघ प्रबोधनपर रॅलीचे कोल्हापूर येथे आयोजन -…
कोल्हापूर -.16.10.2022 रोजी अंधानी अंधांसाठी चालवलेली सामाजिक संघटना राष्ट्रीय दृष्टि हीन संघाच्या वतीने सफेद काठी दिनानिमित्त ऐतिहासिक दसरा चौकातून अंध सभासद आणि सामाजिक कार्यकर्ते यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी श्रीफळ वाढवून व छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून होमिओपॅथी तज्ञ डॉ. संदीप पाटील यांच्या शंख वादनाने करण्यात आले. या रॅलीत सामाजिक कार्यकर्ते टायटन चे प्रसाद कामत,हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे, वालावलकर हॉस्पिटलचे डॉ.विरेंद्र वणकुद्रे यांच्यासह विविध मान्यवर व तालुक्यातून आलेले अंध सभासद सहभागी झाले होते . सर्वाचे प्रांरभी स्वागत करताना संघटक शरद पाटील म्हणाले कि ‘ही संघटना असून गेली 45 वर्षांपासून अंधाचे शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार यासाठी कार्य करत आहे. या संघटनेच्या 7 विभागीय शाखा तर बऱ्याच जिल्हा शाखा आहेत त्यातीलच एक जिल्हा शाखा कोल्हापूर ही 2020 सालापासून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंध बंधू-भगिनींसाठी कार्य करत आहे अशी माहिती देत सर्वाचे स्वागत केले . यावेळी ‘डॉ .बळवंत दांडेकर बँक ऑफ इंडिया – सचिव एसी एसटी ओबीसी संघटना यांनी ही सफेद काठी देवून शुभेच्छा दिल्या . दसरा चौकातून लक्ष्मीपुरी बिंदू चौक शिवाजी चौक मार्गे हिराणी गुजरीतून संभावनात जैन मंदिर येथे गेले तेथे जैन समाजाच्या वतीने अंधाना स्नेहभोजन आणि सफेद काठी देऊन त्यांचे या रॅलीचा समारोप झाला .समारोपा वेळी जयेश ओसवाल पारस ओसवाल यांनी शुभेच्छा पर भाषणे केली.












