*सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवांमध्ये अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे विविध स्पर्धांमध्ये सहभाग*
संग्रामनगर दि.१५ (केदार लोहकरे यांजकडून)तरुणाई जल्लोष असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ युवा महोत्सव मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान पार पडला.कोविड निर्बंधाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर विद्यापीठ स्तरीय “उन्मेष सृजन रंगाचा ” युवा महोत्सवामध्ये कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज मधील आठ विद्यार्थिनी व तेरा विद्यार्थी असे एकूण २१ विद्यार्थ्यांचा संघाने २ सांघिक व १३ वैयक्तिक कलाप्रकारांमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदविला. मंगळवेढ्यात झालेल्या युवा महोत्सवामध्ये बाहेरगावावरून येणार्या विद्यार्थ्यी व प्राध्यापकासाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली होती त्याबरोबरच पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये यासाठी वाॅटरफ्रूफ व्यासपीठासह प्रेक्षकांना निवार्याची व्यवस्था करण्यात आली होती. युवा महोत्सवात पार पडलेल्या सर्व स्पर्धा दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच,श्री संत दामाजीपंत शब्दांगण मंच,महात्मा बसवेश्वर ललित रंगावली,स्व.इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना मंच अशा विविध व्यासपीठावरती संपन्न झाल्या.शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.फार्मसी वर्गातील कु.ज्ञानेश्वरी चंद्रकांत ताठे या विद्यार्थिनीने मातीकाम स्पर्धेत सुंदर श्री विठ्ठल व संत यांची मूर्ती तयार करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून यश संपादन केले.तसेच समूहगीता मधील सहभागी विद्यार्थी सोहम पताळे , सुरज चव्हान , श्रीप्रसाद कुलकर्णी, मेघना तिरकर , साक्षी बेले , प्रतीक्षा लमकाने , अलीशा अतार या विद्यार्थ्यानी हे गीत सादर केले व साथीदार माऊली नवगिरे व विनोद शिंदे हे होते. विद्यार्थ्यांनी डोल डोलतय वाऱ्यावर हे कोळीगीत व लहर लहराये प्यारा तिरंगा हे देशभक्तीपर गीताचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांना देखील या गीतावर ठेका धरायला लावले.युवा महोत्सवामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.श्री.स्वप्निल राजे-घाडगे व प्रा.श्री.महेश मिटकल यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील,मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील संस्थेच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ.अनिल भानवसे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.









