*अकलूजच्या फार्मसी काॅलेजमध्येआंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा.*
संग्रामनगर दि.१३ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महिला आरोग्य व स्वच्छता याविषयाचे व्याख्यान आयोजीत करून आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेटे मॅटर्निटी हॉस्पिटलच्या डॉ.वैष्णवी शेटे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.त्यांनी महिला आरोग्य व स्वच्छता याबाबतीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांच्याशी महिलांविषयी समस्यांची चर्चा करून त्यांचे शंकेचे निरसन केले. व्याख्यानापूर्वी कार्यक्रमाचे औपचारिक उद्घघाटन प्राचार्य डॉ. अनिल भानवसे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेश्मा पवार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा.पूजा शिंदे यांनी मानले.













