अकलूज येथील शिवरत्न गणेश मंडळ यांच्या नियोजित गणेश मंदिर बांधकामास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील विजय चौकातील शिवरत्न गणेश मंडळ यांच्या नियोजित गणेश मंदिर बांधकामास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी मोहिते पाटील यांनी मंदिर बांधण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांचे कौतुक केले.शिवरत्न गणेश मंडळ यावर्षी 54 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हे असून,मंडळाचे सर्व सदस्य संपूर्ण वर्षभरात अनेक सामाजिक, विधायक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत.सदर मंडळाला मोहिते पाटील व माने पाटील परिवाराचे कायम सहकार्य असते. यावर्षी मंडळाने माननीय जयसिंह (बाळ दादा )मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व देणगीदार व शुभचिंतक यांच्या सहकार्याने गणेश मंदिर बांधकामास सुरुवात केली आहे. सदर कामासाठी सर्वांकडून भरघोस मदत मिळत आहे.मंडळाचे कार्यकर्ते उदय शेटे,विशाल गोरे, पिंटू चौगुले, पिनू भोसले, वैभव शेटे,दादा तोडकरी,सुरेश वायकर,उदय पवार,अब्बास पुनावाला,आदित्य सावंत, शिवाजी धनवडे, श्रीवर्धन भूतनाळ, रोहन गिल्डा, अजय शिंदे, आप्पा देवकर, निळकंठ धोत्रे, जावेद शेख, अजिंक्य सावंत, सलीम सय्यद,महेश सूर्यवंशी, दत्ता शिंदे, बबलू वेळापुरे,समर कोथमीरे, बाबा धोत्रे, युवराज मोहिते, शशी शिंदे, प्रशांत कोथमीरे तसेच मंडळाचे आजी, माजी सर्व पदाधिकारी,सर्व कार्यकर्ते सदर मंदिरा चे बांधकाम करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

















