*जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर*सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग
मुंबई : ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का? याकडे मतदाराचं लक्ष लागलंय.*जिल्हानिहाय आरक्षण**सर्वसाधारण*ठाणे रायगड सिंधुदुर्गजळगावपुणे औरंगाबादयवतमाळ बुलढणा वाशिम*सर्वसाधारण (महिला)*नाशिक धुळे सांगली कोल्हापूर लातूर हिंगोली अमरावतीअकोला उस्मानाबाद*अनुसूचित जमाती*पालघर अहमदगर नागपूर *अनुसूचित जमाती (महिला)*भंडारा नंदुरबार *नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)*रत्नागिरी सातारा गडचिरोली *नागरिकांचा मागास प्रवर्ग*सोलापूर नांदेड जालना गोंदिया *अनुसूचित जाती*बीड परभणी *अनुसूचित जाती (महिला)*वर्धा चंद्रपूर







