शिवप्रताप गरुडझेप चित्रपटात अकलूजचे अजय तपकीरे आणि सोमनाथ वैष्णव झळकणार
अकलूज (प्रतिनिधी )विजयादशमी च्या शुभमुहूर्तावर 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात अकलूज चे कलाकार अजय तपकिरे हे छत्रपती *शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”* यांच्या भूमिकेत दिसणार असून दुसरे अकलूजचे कलाकार सोमनाथ वैष्णव हे ” *सर्जेराव जेधे* ” यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. *महाराजांच्या शब्दासाठी आणि आणि स्वराज्यासाठी काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यातील एक एक घराणे म्हणजे जेधे घराणे होय..* ही अकलूजकरांना फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे.या कलाकारांना व ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट पाहण्यासाठी अकलूजकर प्रतीक्षेत आहेत.विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर, ५ ऑक्टोबर रोजी ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत नक्की पहा. असे आवाहन वारसा परिवार, शिवभक्त अकलूजकर यांचे वतीने करण्यात आले आहे.










