उदय इनामदार यांचे निधन
अकलूज ता.29: क्लासिक प्रिंटर्स चे मालक डीटीपी ऑपरेटर तथा पत्रकार उदय सतीश इनामदार ( वय 45 ) यांचे आज गुरूवार (ता. 29 ) रोजीहृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अकलूज व परिसरातील अनेक साप्ताहिके व विविध विशेषांकांचे डीटीपी उदय इनामदार यांच्याकडेच होते . आज जागतिक हृदय दिनाच्या दिवशीच हृदयविकाराने त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेते अतिशय हसतमुख, धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या तिसऱ्या चा विधी 1ऑक्टोबर रोजी सकाळी 8वाजता अकलाई स्मशानभूमी येथे होणार आहे. भावपूर्ण श्रद्धांजली







