माळशिरस तालुक्यात शीतपेयाची छापील किमतीपेक्षा जादा दर आकारून ग्राहकांची लूट .
अकलूज (प्रतिनिधी )ग्राहकांना कोणत्याही प्रकारची वस्तू त्या वस्तूवरील छापील किंमतीतच मिळावी.आणि तो ग्राहकांचा हक्क देखील आहे.यासाठी राज्यात दर नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, या बाबतची पडताळणी करण्यासाठी सक्षम व पुरेशी यंत्रणा शासनाकडे नसल्यामुळे या कायद्याचे माळशिरस तालुक्यात तीन तेरा वाजले आहेत.माळशिरस तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात सध्या शीतपेय ला मोठी मागणी आहे. तरुणांपासून ते आबाल वृद्धापर्यंत याची भुरळ पडली आहे. काही शीतपेय ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून, याचा गैरफायदा घेऊन काही ठराविक वाढत्या मागणी च्या शीतपेय ची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही होलसेल विक्रेते रिटेल विक्रेत्यांना दर वाढवून विक्री करीत आहेत. त्यामुळे रिटेल विक्रेते देखील जादा दर आकारून विक्री करीत आहेत. परंतु त्याचा नाहक आर्थिक फटका ग्राहकांना बसत आहे.या शीतपेय बाटलीचा छापील दरा पेक्षा ग्राहकांची वाढती मागणी असल्याचा व कृत्रिम टंचाई निर्माण करून कुलिंग चार्जेस च्या नावाखाली किंमतीपेक्षा जादा दर आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे..त्याचप्रमाणे इतर प्रकारची शीतपेय काही दुकानात छापील किंमतीत विक्री केली जातात. तर जास्त मागणी असलेल्या शीतपेय ची जादा दर लावून विक्री केली जातात.प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांबरोबरच अर्थपूर्ण लागेबांधे आहेत. यामुळे नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीकडे दूर्लक्ष केले जात आहे. ग्राहकांना नाईलजास्तव छापील किंमतीपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. माळशिरस तालुक्यात अनेक पान टपरी, किराणा दुकान, हॉटेल, मेडिकल, स्विट होम तसेच इतरही काही दुकानात वाढती मागणी असलेल्या शीतपेयाची छापील किमतीपेक्षाही जादा दर आकारून विक्री केली जात आहे.तसेच इतरही काही शीतपेय जादा आकारणी करून विक्री केली जाते. शितपेय विक्रेत्यांनी ग्राहकाची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट चालवली असून, बाटली मागे जादा आकारणी करण्यात येत आहे. या गोष्टी कडे संबंधित अधिकाऱ्याकडून दूर्लक्ष केले जात आहे. एखाद्या वस्तूची छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणात शिक्षा व दंडाचीही तरतूद आहे. सध्या ठराविक शितपेय ला अधिक मागणी आहे. मात्र, छापील किंमतीपेक्षा जादा दराने बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.अनेक प्रकारच्या शीतपेय बाबतीत देखील काही प्रमाणात हाच प्रकार सर्वत्र घडत आहे.काही विक्रेते प्रामाणिकपणे छापील किंमतीत विक्री करीत आहेत. परंतु बहुतांश विक्रेते मात्र कुलिंग चार्जेस च्या नावाखाली जादा दर आकारून ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहेत.या गंभीर गोष्टीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन छापील किमतीपेक्षा जादा दर लावून शीतपेयाची विक्री करणाऱ्या वर कारवाई करावी.तसेच ग्राहकांची होणारी लूट थांबवावी.अशी मागणी जोर धरू लागली आहे.







