*शिवप्रताप-गरुडझेप या चित्रपटाच्या अकलूज येथील प्रिमियर शो चे मोहिते पाटील परिवाराला निर्माते अमोल कोल्हे यांचे निमंत्रण
अकलूज (प्रतिनिधी )मराठी चित्रपट सृष्टीला सध्या सुगीचे दिवस आले असून, ऐतिहासिक चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.अभिनेते,दिग्दर्शक खा.अमोल कोल्हे हे 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी च्या मुहूर्तावर शिवप्रताप -गरुडझेप हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.सध्या या चित्रपटा चा ट्रिजर खूपच व्हायरल होत आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा वाढली आहे. या चित्रपटा च्या माध्यमातून साडे तीनशे वर्षांपूर्वीचा थरार रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.या चित्रपटात अमोल रामसिंग कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रमुख भूमिका साकारीत आहेत. जगदंब क्रियेशन्स प्रस्तुत या चित्रपटा ची निर्मिती अमोल कोल्हे यांनी केली असून, दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. जिजाऊंच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आहेत. तर क्रूर मुघल बादशहा औरंगजेब च्या भूमिकेत यतीन कार्येकर हे आहेत. मनवा नाईक ही अभिनेत्री शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहेत. तर अकलूज च्या कलाकारांचे आश्रयदाते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तालमीत व डॉ. विश्वनाथ आवड (सर )यांच्या मार्गदर्शन खाली तयार झालेले अकलूज चे हरहुन्नरी कलाकार अजय तपकीरे हे बहिर्जी नाईक ची भूमिका साकारीत आहेत.तसेच हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, पल्लवी वैद्य, रमेश रोकडे अलका कौशल, आदी इराणी, यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.अमोल कोल्हे यांचेबरोबर विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, हे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सह निर्माते आहेत. रवींद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांनी केले आहे. संकलन पीटर गुड्डा यांचे आहे.अमोल कोल्हे दिग्दर्शित शिवप्रताप-गरुडझेप या चित्रपटात अकलुजच्या कलाकारांनी अभिनय केला आहे.सदर चित्रपट चा प्रीमियर अकलूज येथील श्रीराम चित्रमंदिर येथे 5ऑक्टोबर रोजी होत असून या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी 26सप्टेंबर रोजी शिवरत्न बंगला अकलुज येथे माजी उपमुख्यमंत्री .विजयसिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट घेवुन शिवप्रताप-गरुडझेप या चित्रपटाच्या प्रिमियर शो चे निमंत्रण दिले.यावेळी त्यांचा मोहिते पाटील परिवाराच्या वतीने सन्मान केला.या प्रसंगी आ.रणजितसिंह मोहिते पाटील ,.अर्जुनसिंह मोहिते पाटील,.शिवतेजसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. अकलूज आणि परिसरातील नागरिक हे कलाप्रेमी असून हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहतील. आणि भरभरून प्रतिसाद देतील यात शंकाच नाही. अशी ग्वाही मोहिते पाटील परिवार यांनी अमोल कोल्हे यांना दिली.









