*ठाकरेंवर टीका; मंत्री तानाजी सावंतांची जीभ घसरली*बीड : राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ते बीड दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. तानाजी सावंत म्हणाले की, ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली. त्यामुळे तुम्हाला आमच्यावर बोलायचा अधीकार नसल्याची टीका मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता? शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय? असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली आहे, अशी जहरी टीका सावंतांनी केली. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांची बोलताना जीभ घसरल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.https://letsup.app.link/lZVRPK4k







