पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या”आयडिया ऑफ इंडिया” या पुस्तकाचे प्रकाशनपूर्व बुकिंग नोंदणी अभियान सुरु.
अकलूज (प्रतिनिधी )१३० कोटी भारतीय जनतेच्या सेवेत २० वर्षे पूर्ण झालेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “आयडिया ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले असून,या पुस्तकाचे प्रकाशन पूर्व बुकिंग नोंदणी अभियान श्रीपूर येथे माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने राबविण्यात आले. मोदी@ २० : ड्रीम्स मीट डिलीव्हरी या नवीन पुस्तकांतून आपल्याला मोदीजी यांचे कार्य कर्तृत्व आपल्याला येत्या ११ ऑक्टोबर पासून समजणार आहे.आणि या पुस्तकाचे बुकिंग नोंदणी साठी सेवा पंधरवडा प्रदर्शन अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी.आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व जिल्हा संघटण सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातून..सुरज महस्के.रतनसिंह राजपूत.नानासाहेब मुंडफणे.डॉक्टर हरिश्चंद्र सावंत पाटील.निनाद पटवर्धन.सागर यादव.मोहसिन पठाण..सोमनाथ मुंडफणे.अल्लाबक्ष शेख.सौ.कल्पना कुलकर्णी .सोनाली सुमंत,रमेश देवकर.व सहसंयोजक अमित पुंज उपस्थित होते.मोदी@ ट्वेंटी या पुस्तकाचे प्रकाशन पूर्व नोंदणी 1)दिनांक 25 /9/ 2022 रविवार सकाळी दहा ते बारा माळीनगर, तसेच दुपारी 12 ते 2 सदाशिवनगर 2)दिनांक 28/ 9 /2022, सकाळी 10 ते 12 फोंडशिरस, 3)दिनांक 1/10/2022 शिवरत्न नॉलेज सिटी ११ ते ३ 4)दिनांक 2/9/22 सकाळी 10 ते 12 पिलीव येथे होणार आहे .तसेच ज्यांना या ठिकाणी नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी अमित पुंज मोबाईल नंबर 98 60 71 48 68 यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून ही नोंदणी करता येणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी. असे संयोजकांनी आवाहन केले आहे.








