जागतिक स्तरावरील मोदींच्या नेतृत्वामुळे भारताचा जगभरात नावलौकिक ; आ.राम सातपुते
वेळापूर-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक स्तरावरील नेतृत्वामुळे भारताचा जगभरात नावलौकिक वाढताना दिसत आहे असे मत माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले.देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांचे वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व युवक मोर्चा यांचे कडुन वेळापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावरील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांचे शुभहस्ते यावेळी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सेवा पंधरावडा या कार्यक्रमानिमित्त वेळापूरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अमरभाऊ माने-देशमुख, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतभैया माने-देशमुख,धनंजय माने देशमुख,महादेव ताटे,सुरज मस्के,अमित पुंज,स्वप्नील शहाणे,बाळासाहेब माने देशमुख, चंद्रकांत जाधव, शंकर काकुळे, अरविंद जाधव, धनंजय सावंत ,अजितराव माने देशमुख, तुकाराम भुसारे, नामदेव देवकाते, उत्तम काशीद ,चंद्रकांत जाधव, आंबुकाका माने देशमुख,ओंकार माने देशमुख ,मिलिंद सरतापे,महेश काळे,विलास पाटील, सोमनाथ भोसले ,भैया इनामदार, गोपाळ शिंदे तानाजी मुंगूसकर , रामचंद्र माने देशमुख, सयाजी उघडे, उमेश भाकरे,उमेश बनकर , दीपक राऊत राहुल ,चौगुले ,भैया कोडक, रईस मुलानी ,बाळासाहेब आडत, माऊली म्हेत्रे, गणेश चव्हाण, श्रीकृष्ण देशपांडे पांडुरंग माने ,ज्ञानेश्वर देशपांडे भैय्या कुलकर्णी,विनायक देशपांडे ,सतीश नवले, पिनू काका देशपांडे ,गणेश आडत,आनंद अडसूळ, ज्ञानेश्वर देशपांडे, भैय्या कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदारा सातपुते बोलताना पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी हे देशाला लाभलेले अनमोल रत्न आहे त्यांच्या कार्यामुळे आज सर्वसामान्य जनतेला न्याय मिळताना दिसत आहे.याप्रसंगी आमदार सातपुते यांनी चित्रप्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले.








