• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे 19सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी भव्य मोर्चा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 9, 2022
in महाराष्ट्र
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे 19सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी भव्य मोर्चा
0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे 19सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी भव्य मोर्चा

कळंब (प्रतिनिधी )मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा,आंदोलने होऊनही मराठा समाजाला अद्याप शाश्वत आरक्षण मिळालेेले नाही. तसेच शासनाने वारंवार घोषणा करूनही वेगवेगळ्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे कळंबमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 19 सप्टेंबर रोजी कळंब उपविभागीय कार्यालयावर हा भव्य मोर्चा निघणार असून, या मोर्चात तालुक्यातील 40 हजारांवर मराठे सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेतल्या जात आहेत.संपूर्ण तालुका पिंजून काढण्यात आला आहे.मराठा समाजाला संविधानिक दृष्ट्या कायद्याच्या चौकटीत टिकणारे मराठा आरक्षण हे “ओबीसी” प्रवर्गातूनच दिले जावे या प्रमुख मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून,यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजावर होत असलेला अन्याय, शिक्षण क्षेत्रात होत असलेली मराठा समाजाची पिछेहाट, आरक्षणाच्या संदर्भात असलेल्या कायदेशीर तरतुदी यामुळे नोकरीतले प्रमाण घटत असून,यामुळे समाजातील विद्यार्थी-शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 5 वर्षांपूर्वी राज्यातील सकल मराठा समाजाने शांततामय मार्गाने 58 मोर्चे काढले.त्यानंतर ठोक मोर्चेही काढण्यात आले. मात्र अद्यापही आरक्षण मिळाले नाही. कायदेशीर दृष्ट्या मराठा समाजाला केवळ ओबीसी प्रवर्गातून दिलेले आरक्षण टिकू शकते, या मुळ मुद्द्यावर समाजाची एक वाक्यता झाली असून,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे यावर एकमत झाल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.दरम्यान, या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा कळंब तालुक्यात मराठे इतिहास घडविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वयंसेवकांची तयारी

महामोर्चाच्या अनुषंगाने युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहेत. मराठा समाजातील प्रत्येक युवक हातात पडेल ते काम करत आहे. त्यासाठी स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली आहे. प्रत्येकजण महामोर्चाचा संदेश गावागावात पोहोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील अंादोलनाचा हा जिल्ह्यातला हा सर्वात मोठा मोर्चा असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

.6 डिसेंबर 2016 नंतर दुसऱ्यांदा दिसणार विक्रमी गर्दी,

कळंब तालुक्याला निजामाच्या काळापासून आंदोलने व चळवळी झालेल्या आहेत. त्यामुळे तालुक्याला चळवळीचा इतिहास आहे. मात्र कळंब तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ६ डिसेंबर २०१६ ला कळंबच्या इतिहासातील पहिला आणि सर्वात मोठा मराठा समाजाचा महामोर्चा निघाला असल्याचे वयोवृध्द सांगतात. आता दुसऱ्यांदा तेच मराठे दुसरे रेकॉर्ड तयार करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिस्तीत मोर्चा, पण शहर दणाणणार

मराठा मोर्चामध्ये विद्यार्थिनी अग्रभागी असतील. त्यानंतर महिला व त्यानंतर मुले, तरूण, असे नियोजन सुरू आहे. मात्र, सुरूवातीच्या मोर्चाप्रमाणे आता मौन पाळले जाणार नाही तर हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा दिल्या जातील,त्यामुळे शहर दणाणून जाणार आहे.

आता 50 टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी

मराठा समाजाच्या मागणीमध्ये आता प्रमुख बदल झाला आहे. या बदलानुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच 50 टक्क्याच्या आत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण असेल. त्यावर मराठा समाजाचा हक्क आहे, असा दावा समाजाकडून केला जात आहे.स्वखर्चाने प्रचारगावागावात जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवकांच्या टीम दररोज दाखल होत आहेत तर ७ वाहनांच्या स्पिकरवरून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण नियोजनासाठी समाजाकडून एकही रूपया न घेता स्वयंसेवकांच्या स्वखर्चातून कार्य सुरू आहे. प्रत्येक घटकाने वेगवेगळी जबाबदारी स्विकारली असून, त्यामुळे रक्कम संकलित करण्यात येणार नाही, असे नियोजन ठरले आहे. कुणी वाहनांची, कुणी डिजीटल होर्डिंग्ज, पाणी, प्रचारसाहित्य आदींची जबाबदारी स्विकारली असल्याचे संयाेजकांनी सांगितले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
जनावरांच्या “ल॑म्पी स्किन” आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून  12सप्टेंबर 2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा “जनावरांचा बाजार “बंद राहणार.

जनावरांच्या "ल॑म्पी स्किन" आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 12सप्टेंबर 2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा "जनावरांचा बाजार "बंद राहणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In