जनावरांच्या “ल॑म्पी स्किन” आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 12सप्टेंबर 2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा “जनावरांचा बाजार “बंद राहणार.
अकलूज (प्रतिनिधी )जनावरांच्या “ल॑म्पी स्किन” आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोमवार दिनांक 12सप्टेंबर 2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा “जनावरांचा बाजार “बंद राहील असा आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जावक क्रमांक आ व्य म.पु./कार्यालय/आर आर /6752/2022अन्वये आदेश दिल्याने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पत्रकाद्वारे आवाहन केले असून,याची सर्व पशुपालक, शेतकरी व व्यापारी यांनी दखल घेऊन आपली जनावरे(गाय, बैल, म्हैस, शेळी -मेंढी, इत्यादी )विक्रीसाठी न आणता कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती अकलूज चे सचिव राजेंद्र काकडे यांनी केले आहे.






