गुजर हास्पिटल अँड मटर्निटी होम अकलूजच्या शिरपेचात मानाचा तुरा…
अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यामधील सन्माननिय डॉ. विवेक गुजर व डॉ.सौ. सविता गुजर यांनी आपल्या अविरत आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांची मनोभावे सेवा केलेली आहे. त्यांच्या या सेवेचे फलित म्हणून गुजर हॉस्पिटल व मटर्निटी होम या हॉस्पिटलला NATIONAL ACCREDITATION BOARD FOR HOSPITALS ( NABH ) या मानांकनाने गौरवण्यात आले आहे. हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रदात्या साठी जे राष्ट्रीय मान्यता मंडळ आहे, त्या मंडळांनी दिनांक 12 मे 2022 रोजी गुजर हास्पिटल ची तपासणी केलेली होती . NABH हे एक भारतातील गुणवत्ता परिषदेचे एक घटक मंडळ आहे , या मंडळाची स्थापना आरोग्यसेवा संस्थांसाठी मान्यता कार्यक्रम स्थापित करण्यासाठी करण्यात आलेली आहे. आणि याच्या माध्यमातून आज गुजर हास्पिटलला NABH मानांकन मिळाले आहे.या मान्यताप्राप्तीमुळे गुजर हास्पिटलमध्ये उच्च दर्जाची काळजी व रुग्णांची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे हे सिद्ध झालेले आहे . येथे रुग्णांची सेवा उच्चशिक्षित व अनुभवी वैद्यकीय कर्मचारी यांचे द्वारे केली जाते. NABH च्या मानांकनामध्ये अनेक मानकांचा समावेश आहे . त्यामध्ये हॉस्पिटल ची जागा , अत्याधुनिक व सुसज्ज इमारत , तज्ञ डॉक्टर , आरोग्य कर्मचारी सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅब , औषधालय , हॉटेल , हॉस्पिटलचे प्रसन्न असे वातावरण , लिफ्टची सोय , रुग्णांचे अभिप्राय पुस्तक आणि सर्वात महत्त्वाचे हॉस्पिटल ची गुणवत्ता यांची तपासणी होऊन या मानांकनावर शिक्कामोर्तब करण्यात येते.या सर्व मानकांवर गुजर हॉस्पिटल हे पात्र ठरलेले आहे. आणि त्यास आज मान्यता मिळालेली आहे. NABH या मानंकनामुळे गुजर हास्पिटल चे सर्वेसर्वा सन्माननिय डॉ . विवेक गुजर व सन्माननिय डॉ . सौ. सविता गुजर यांची व सर्व कर्मचार्यांची कार्यक्षमता सिद्ध झालेली आहे . गुजर हॉस्पिटलला मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्तीसाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.







