*2500 दिव्यांग बांधवाना यू डी आय डी कार्डचे वाटप…..* *आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील* यांनी वैष्णवीदेवी मोहिते पाटील सभापती असताना दिव्यांग बांधवांसाठी यू डी आय डी कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने माळशिरस पंचायत समिती कार्यालय येथे व संपूर्ण तालुक्यामध्ये यू डी आय डी कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन केले होते या कॅम्प मध्ये 4000 दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली होती. यातील 2500 तयार कार्डचे औपचारिक स्वरूपात वाटप *आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते व भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील* यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ही नोंदणी करीत असताना पंचायत समिती माळशिरसचे मोलाचे सहकार्य मिळाले. या नोंदणीकृत कार्डमुळे दिव्यांग बांधवाना वयक्तिक व सार्वजनिक योजनाचा लाभ घेता येणार आहे यामुळे दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे रत्नप्रभादेवी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व शहाजी देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी प्रांत ज्योती कदम मॅडम, माळशिरस तसीलदार अभिजित निंबाळकर,माजी उपसभापती अर्जनसिंह मोहिते पाटील, प्रताप (आबा) पाटील , राहुल बापू वाघमोडे ,माजी जिल्हा परिषद सदस्यां सुनंदा फुले, रत्नप्रभादेवी अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, शहाजी देशमुख व यू डी आय डी कार्ड धारक दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.










