*कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्षपदी अॅड.विवेक एन.घाटगे यांची निवड झाले बद्दल सत्कार करणेत आला.*
संग्रामनगर दि.२३ (केदार लोहकरे याजकडून)बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्षपदी अॅड.विवेक घाटगे यांची निवड झाले बद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करणेत आला. यावेळी शहरातील सिटी क्रिमिनल बार असो,सहकार बार असो,कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन,लेबर बार असोसिएशन,तसेच तालुका बार असोसिएशनमध्ये राधानगरी,वडगाव, इचलकरंजी,शाहूवाडी,सांगली बार असोसिएशन,जयसिंगपूर बार असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ व वह्या देऊन सत्कार करणेत आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत सचिव अॅड.विजयकुमार ताटे देशमुख यांनी केली.यावेळी व्यासपीठ वरती कोल्हापूर जिल्हा बार असो अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड.एम.डी.अडगुळे, जिल्हा सरकारी वकील अॅड.विवेक शुक्ल,उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी सत्कार समारंभ वेळी माजी अध्यक्ष अॅड.एम.डी.अडगुळे म्हणाले की,अॅड.विवेक घाटगे यांना मिळाले उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळमध्ये त्यांनी वकील वेल्फअर फंड,वकील प्रोटेक्टशन ऍक्ट मंजूर करणेकरीता प्रयत्न करावेत.तसेच सर्किट बेंच स्थापने बाबत प्रयत्न करावेत.या प्रसंगी अध्यक्ष गिरीश खडके,अॅड.पी.वाय.चिटणीस,अॅड. विवेक शुक्ल,अॅड.प्रकाश मोरे,अॅड.कोमलराव राणे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्कारपर उत्तर देताना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे नूतन उपाध्यक्ष अॅड.विवेक घाटगे म्हणाले की माझे हे उपाध्यक्ष पद हे सर्वस्वी वकिलांचे वेल्फेअर करीता राहील.बार कौन्सिल मार्फत सर्व वकिलांना लवकर जास्तीची मेडिकल सहायता,इन्शुरन्स विमा मिळणे करीता प्रयत्न केला जाईल. तसेच आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा सर्किट बेंच प्रश्न लवकर सोडवण्या करीता सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.जी.के.वागरे,अॅड.अमित सिंग,अॅड.संजयभोसले,अॅड.खटावकर,अॅड.चंद्रकांत पाटील,अॅड.दिपक देसाई,अॅड.प्रताप जाधव,अॅड.नामदेवराव साळोखे,सांगली बार असोसिएशनचे पदाधिकारी,तसेच कोल्हापूर बार असोसिएशनचे सर्व माजी अध्यक्ष,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण यांनी केले.







