• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

जिल्ह्यातील रस्ते , वीज , पाणी , शेती , पशुधन व शाळा दुरुस्तीसाठी शासनाने निधी द्यावा : आरणजितसिंह मोहिते पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील रस्ते , वीज , पाणी , शेती , पशुधन व शाळा दुरुस्तीसाठी  शासनाने निधी द्यावा :  आरणजितसिंह मोहिते पाटील
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील रस्ते , वीज , पाणी , शेती , पशुधन व शाळा दुरुस्तीसाठी शासनाने निधी द्यावा : आ मोहिते पाटील अकलूज / प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील रस्ते , वीज , पाणी , शेती , पशुधन व शाळा दुरुस्तीसाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत केली . मुंबईत पावसाळी अधिवेशनात आ मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले . आ मोहिते पाटील म्हणाले , सोलापूर जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय रस्ते महामार्गच्या माध्यमातून विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत . परंतु ही कामे करीत असताना शेतकऱ्यांच्या शेतजमीन मोजणीचा प्रश्न येतो . भूमीअभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणी करुन देणाऱ्या मोजणीदारांची संख्या कमी असल्याने अती तातडीची जमीन मोजणीची रक्कम भरुनही शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीची मोजणी करुन मिळत नाही . त्यामुळे रस्ते विकासासाठी हजारो कोटींचा निधी येवूनही केवळ शेतजमीन मोजणी न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही व रस्त्यांची कामे खोळंबली आहेत . ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने भुमिअभिलेखांची तातडीने भरती करावी अशी मागणी त्यांनी केली . आ मोहिते पाटील म्हणाले , जिल्ह्यात वनविभागाने अनेक ठिकाणी जमीनीवर हक्क सांगितल्याने रस्त्याची कामे थांबली आहेत . पुर्वी तेथे रस्ता होता . परंतु वनविभागाने वृक्षारोपण करुन त्या रस्त्यावर आपला हक्क सांगितला आहे . याकामी शासनाने लक्ष घालावे असेही आ मोहिते पाटील यांनी सांगितले . राज्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे साडेपंधरा लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे . सोलापूर जिल्ह्यातील बार्शी , करमाळा , उत्तर सोलापूर , दक्षिण सोलापूर , अक्कलकोट आदी तालुक्यात पूर , अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे . परंतु शासनाच्या यादीत सोलापूर जिल्हा वगळला आहे . त्याचा समावेश करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी . सोलापूर शहरात २३ एकर जागेवर महात्मा गांधी प्राणी संग्रहालय उभा आहे . गेल्या तीन वर्षापासून हे प्राणी संग्रहालय बंद आहे . केंद्रीय कमिटीने या संग्रहालयाला भेट देवून त्रुटी दुर करण्यासंदर्भात सुचना केल्या आहेत. शासनाने काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास पर्यटनाच्या दृष्टीने ते फायदेशीर होइल . सध्या सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे . उजनी बॅकवॉटरमुळे एकट्या करमाळा तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे . येथे राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय केळी संशोधन उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी आ मोहिते पाटील यांनी केली . राज्यात ३ कोटी ६१ लाख पशुधन आहे तर केवळ ४ हजार ८४० पशुवैद्यकीय दवाखाने तर ३४ कृत्रिम रेतन केंद्रे आहेत .५ हजार पशुधनामागे एक डाॅक्टर असे आणखी सहा हजार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची शासनाने नेमणूक करावी . सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ आहे . परंतु या विद्यापीठाच्या कार्यालयीन इमारतीसाठी निधी नाही . शासनाने १२ कोटीचा निधी तत्काळ उपलब्ध करुन द्यावा .सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २ हजार ९६७ शाळा आहेत तर सुमारे २ लाख ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . यापैकी ५०४ शाळांमधील १२०० वर्गखोल्या नादुरुस्त आहेत त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे. त्यासाठी ६० कोटीचा निधी द्यावा . राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शासनाने १० हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे . सोलापूर जिल्ह्यात ५०० किलोमीटर रस्त्यासाठी ३७५ कोटी रुपयांची गरज असून ती शासनाने उपलब्ध करुन द्यावी . उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रात सोलापूर व पुणे जिल्हा येतो .सोलापुर जिल्ह्यातील ३६१ गावातील ३० पाणी पुरवठा योजना उजनीवर अवलंबून आहेत त्यापैकी २० पाणीपुरवठा योजना वीज बिल न भरल्याने बंद आहेत. एका पाणी पुरवठा योजनेवर एका पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे . बील कुणी भरावे यासाठी या योजना बंद आहेत . शासनाने यात पुढाकार घ्यावा व वीज बिलाचा प्रश्न निकाली काढुन या पाणीपुरवठा योजनांचे पुनरज्जीवन करावे अशी मागणीही आ मोहिते पाटील यांनी केली .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
सत्ता हातात द्या सर्व टोलनाके बंद करतो : राज ठाकरे

सत्ता हातात द्या सर्व टोलनाके बंद करतो : राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In