*सत्ता हातात द्या सर्व टोलनाके बंद करतो : राज ठाकरे
*मुंबई : सत्ता हातात द्या, टोल बंद करतो, असं मोठं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. ते मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांनी टोल वसुलीबाबत जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे हे त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा राजकारणात सक्रिय झालेत. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप करण्यात येतोय. मात्र हा आरोप चुकीचा आहे, अशी फटकेबाजी करत राज ठाकरेंनी टोलमध्ये जमा होणारे पैसे कुठे जातात? असा सवाल उपस्थित केला.बहुसदस्यीय वार्ड पद्धतीवर राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला. यूपी, बिहार सारखं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे. अडीच वर्ष जे झालं ते योग्य नव्हतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.राजकारणासाठी थोर पुरुषांचा वापर सुरू आहे. पण हे चुकीचं आहे, वारसा हा वास्तूंचा नव्हे तर विचारांचा असायला हवा, असं राज ठाकरे म्हाणाले. दरम्यान, राज्यभरातून मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईमध्ये या मेळाव्यासाठी दाखल झाले.







