*श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालयात जन्माअष्टमी विविध उपक्रमांनी साजरी.*
संग्रामनगर दि.२३ (केदार लोहकरे याजकडून)संग्रामनगर येथिल श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय प्राथमिक विभागातील बाळगोपाळांनी विविध उपक्रमांनी मोठ्या ऊत्साहात श्रीकृष्ण जन्माअष्टमी साजरी करण्यात आली. संग्रामनगर येथील जयसिंह मोहिते-पाटील प्रशालेमध्ये श्रीकृष्ण जन्मअष्टमी निमित्त दहीहंडी व महिला पालकांसाठी हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच प्रशालेतील बालगोपाळांनी विविध वेषभुषेत येवुन या आनंद सोहळ्याची शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा नूतन अंधारे होत्या.मुलांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.लहान मुलांनी श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषेमध्ये आलेली मुलं अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महादेवराव अंधारे यांनी मनोगतामधून सर्व मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देवुन तसेच उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमांमध्ये श्रीकृष्ण व राधा यांच्या जीवनपटाचा आढावा व महत्व प्रशालेतील सौ. कदम यांनी घेतला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महादेवराव अंधारे यांच्या वतीने प्रशालेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक खंडागळे यांनी केले व सूत्रसंचालन सौ.पवार मॅडम यांनी केले व आभार तांबोळी सर यांनी केले.






