*सडपातळ, मध्यम व जाड लोकांनी आपल्या गोलनुसार शरीराचे व्यवस्थापन कसे करावे?**…….. गौतम भंडारे, फिटनेस ट्रेनर, आयएफएसआय इन्स्टिट्यूट, पुणे*
मागील लेखात आपण वेट लॉस व फॅट लॉस म्हणजे काय? हे सविस्तर पाहिले. त्यामुळे अनेक लोकांचा गैरसमज दूर झाल्याने आरोग्यविषयक लेख नेहमी लिहिण्यासंदर्भात काहीजणांचे कॉल आले. वास्तविक पाहता आरोग्यविषयक म्हटले की, डॉक्टरांचा विषय येतो. डॉक्टरांमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्यांना डाएटसंदर्भात काडीचीही माहिती नसते. त्यामुळे स्पोर्ट न्यूट्रीशन या कोर्ससाठी अनेक डॉक्टर सुध्दा ॲडमिशन घेतात. काहीजण म्हणतात की, आपण ज्या काही टॅब्लेट खातो त्यासाठी डॉक्टरांना विचारले पाहिजे, त्यांच्यासाठी सदरची माहिती दिली. यादरम्यान काही प्रमाणात विषयांतर झाले. लोकांच्या बॉडीमध्ये तीन प्रकार असतात. सडपातळ म्हणजेच ॲक्टोमॉर्फ, मध्यम म्हणजेच मेझोमॉर्फ व जाड म्हणजेच एण्डोमॉर्फ. वरील तिन्ही प्रकारचे लोक जीममध्ये त्यांचा गोल ठरवून बॉडी ट्रान्सफर करण्यासाठी येत असतात. सडपातळ लोकांचा बीएमआर एकदम जास्त असतो, त्यामुळे त्याने कितीही खाल्ले आणि कितीही वर्कआऊट केला तरी त्याच्या स्नायूंची वाढ होत नाही. म्हणून त्याला थोडे कमी करण्यासाठी व लीन बॉडी मास म्हणजेच स्नायू वाढविण्याठी कॅल्क्युलेशन करून डाएटसह वर्कआऊटचे प्रोग्रामिंग करून द्यावे लागते. यादरम्यान प्रोटीनपेक्षा कार्ब्सचा रेश्यू १:२ करून काही कालावधीत फरक नाही पडला तर १:३ करावा लागतो. तसेच गेनर घेतला तर अतिउत्तम. मध्यम लोकांचा बीएमआर थोडासा जादा असतो, त्यांची बॉडी गॉड गिफ्टेड असते. त्यांच्याही बॉडीचे कॅल्क्युलेशन करून बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी डाएटसह वर्कआऊट प्रोग्रामिंग करून द्यावे लागते. तर जाड लोकांचा बीएमआर अत्यंत कमी असतो. म्हणजेच कॅलरीज बर्न करण्याचा दर अत्यंत कमी असतो. त्यामुळे त्यांचा कॅलरीज बर्न करण्याचा दर वाढविण्यासाठी वेट ट्रेनिंगसह योग्य प्रमाणात डाएट प्लॅन करून द्यावा लागतो. यादरम्यान लोकांचा एक समज आहे की, आपण जास्त वेळ ट्रेडमीलवर चाललो आणि जादा घाम आला की, आपले फॅट कमी होते. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. यामुळे फॅट कमी होत नाही, तर घामाद्वारे आपल्या शरीरातील सोडियम बाहेर पडून थकवा येऊ शकतो. तसेच मसल लॉसही होतो. त्यामुळे फॅट कमी करण्यासाठी आपल्याला वेट ट्रेनिंगसह योग्य डाएटच फॉलो करावा लागतो. महिला असो किंवा पुरूष फॅट कमी करण्यासाठी त्यांना वेट ट्रेनिंगच जास्त फायदेशीर ठरते. यादरम्यान डाएटमध्ये प्रोटीन आणि कार्ब्सचा रेश्यू १:१ असा ठेवावा लागतो. व्यक्ती सडपातळ असो, मध्यम असो किंवा जाड असो त्यांना वेट ट्रेनिंग केल्यावरच इपोक इफेक्ट मिळतो. म्हणजे वर्कआऊट केल्यानंतर आपली बॉडी २४ तास मसल रिपेअरसाठी जास्तीत जास्त कॅलरी बर्न करते. वर्कआऊटमुळे मसलमध्ये मायक्रो ट्रामा होतो. त्यामुळे मसलला रिपेअर करण्यासाठी योग्य डाएट करावा लागतो. तिन्ही प्रकारच्या लोकांना आपले सिक्स पॅक व बायसेफ चांगले दिसावेत असे वाटत असते. तर काहीजण केवळ आपल्या फिटनेस संदर्भात येत असतात. मात्र ज्यांना जीममध्ये जाणे शक्य नाही त्यांनी निदान ४ ते ५ किमी वॉकिंग करून योग्य डाएट फॉलो केला तरी त्यांचे फॅट कमी होऊन त्यांचे शरीर सुडौल राहते. पण हे सर्व हळूहळू होत असते, मात्र काही जाड लोकांना अतिघाई झाल्याने ते कुठलीही औषधे घेऊन आपले पोट कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते जी औषधे घेतात ती बंद केल्यानंतर ते जितक्या लवकर कमी झाले तितक्याच लवकर पुन्हा जाड होतात. यालाच यो-यो सिंड्रोम म्हणतात. म्हणून सडपातळ, मध्यम व जाड लोकांनी आपला गोल पूर्ण करण्यासाठी योग्य डाएटसह वेट ट्रेनिंग करणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक पाहता पोट कमी करण्यासाठी काहीजण एकच वेळ जेवण करतात. तर काहीजण सकाळी उठताच गरम पाणी पितात. पण यामुळे फॅट लॉससह मसल लॉसही होतो. त्यामुळे आपल्या शरीरावर सुरकुत्या दिसतात. म्हणूनच मसल म्हणजे स्नायू वाढविल्यावर फॅट कमी झाले तरी आपली बॉडी फिट दिसते. यासाठी वेट ट्रेनिंग व डाएट हा खूप महत्वाचा आहे. पुढच्या लेखात आपण सप्लीमेंट्स समज, गैरसमज यासंदर्भात सविस्तर पाहू या.







