शकुंतला (भाभी )गोकुळदास शहा यांचे निधन.मुकुंद शहा यांना मातृशोक.
अकलूज (प्रतिनिधी )इंदापूर शहरातील नामांकित कापड व्यापारी व शहा ब्रदर्स चे मालक इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मातोश्री व गोकुळदास शहा यांच्या पत्नी शकुंतला (भाभी )गोकुळदास शहा (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या अकलूज येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.त्या मुळच्या बावडा येथील होत्या. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन राजकारणाचे देखील धडे दिले. समाजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक गोरगरिबांना त्यांनी सढळ हाताने मदत केली होती. अनेकांचे संसार फुलविले होते. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पाठीमागे दोन मुले, ४ मुली, जावई,नातु असा मोठा परिवार असुन, विद्यमान नगराध्याक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या त्या सासु होत.तर कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या काकु होत्या. प्रगतशील शेतकरी अंगद शहा यांच्या त्या आजी होत.बुधवारी दि.०३ आंगस्ट रोजी त्यांचा अंत्यविधी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान शहरातील हिंदू स्मशाभूमीत करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,सोनाई ग्रुपचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,मधुकर भरणे,अरविंद वाघ, मयूरसिंह पाटील यांच्यासह शैक्षणिक राजकीय,सामाजिक,धार्मिक, वैद्यकीय, व्यावसायिक क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.तिसऱ्या चा विधी शुक्रवार 5ऑगस्ट रोजी सकाळी होणार आहे.










