वाफेगावचे माजी सरपंच मारुती मनोहर घोडके यांचे निधन.
अकलूज (प्रतिनिधी)माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील माजी सरपंच मारुती मनोहर घोडके (वय 52)यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने ३ ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांचे पाठीमागे पत्नी ,दोन मुले,एक विवाहित मुलगी असा परिवार आहेत्यांच्या अकाली निधनामुळे वाफेगाव गावावर शोककळा पसरली आहे .मारुती घोडके हे मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक होते. ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या तिसऱ्याचा विधी 5ऑगस्ट रोजी सकाळी वाफेगाव येथे होणार आहे.






