*ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…
*नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने उसाचा योग्य भाव आणि एफआरपी रक्कम एका टनामागे 150 रुपयांनी वाढवली. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3050 रुपये एफआरपी रक्कम मिळेल. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत एफआरपीसह अनेक निषयांवर निर्णय घेण्यात आला.त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाने संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क संमेलनाला सूचना देण्यासाठी भारताच्या अद्ययावत करण्यात आलेल्या राष्ट्रीय निर्धारित योगदान (एनडीसी) ला मंजुरी दिली. या मंजुरीने पक्षाच्या बैठकीत (सीओपी26) घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या ‘पंचामृत’ ला प्रगत हवामान उद्दिष्टांमध्ये रूपांतरित केले आहे.यामध्ये सांगण्यात आलं आहे की, अद्ययावत एनडीसी, पॅरिस करारा अंतर्गत परस्पर संमतीने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना जोर देण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात आला आहे.







