धैर्यशील मोहिते पाटील यांचा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
अकलूज (प्रतिनिधी ): भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांना मुंबई उच्चन्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विजय सहकारी बँकेचे कर्ज वसुलीसाठी मारहाण करून डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिल्या बाबत धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता तो अर्ज माळशिरस न्यायालयाने निकाली काढत अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला होता . त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या न्यायालयात त्यांची बाजू ॲड. अशोक मुंदर्गी व ॲड. अभिजीत कुलकर्णी यांनी मांडली त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने मोहिते-पाटील यांना जामीन मंजूर केला आहे. धैर्यशिल मोहिते पाटील यांच्याबरोबरच राहुल उर्फ बंटी जगताप, काका जगदाळे व संतोष ऐवळे यांनाही जामीन मंजूर झाला आहे.







