नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अनिल खुराणा यांची होमिओपॅथीच्या प्रलंबित मागण्या संदर्भात भेट…
नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अनिल खुराणा यांची होमिओपॅथीचे नेते डॉ. अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीच्या प्रलंबित मागण्या संदर्भात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉ.सोमनाथ गोसावी, प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड व डॉ.प्रतीक तांबे, येरला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रमोदिनी पागे, रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ. अकल्पिता परांजपे उपस्थित होत्या.केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशनमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना डावलले जात असून महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेतर्फे वारंवार पत्र व्यवहार करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल डॉ.अनिल खुराणा यांची भेट घेतली, त्यांना योग्य ती माहिती दिली असता त्यांनी याबाबतीत योग्य ती कारवाई करू असे सांगितले.देशभरातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या परवानग्या ह्या वर्ष चालू व्हायच्या आधी दिल्या तर संबंधित काॅलेज यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही असे डॉ.अरुण भस्मे यांनी सांगितले,या बाबतीत ही डॉ.अनिल खुराणा यांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच बी.एच.एम.एस.इंटर्नशिप डॉक्टरांना त्यांच्या इंटर्नशिप कालावधीमध्ये होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमाबरोबर मॉडर्न सायन्सचे सुद्धा ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी 6 महिने अॅलोपॅथी हाॅस्पिटलमध्ये काम करता यावे यासाठी एन.सी.एच.च्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात यावी याबाबत महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेच्या वतीने पत्रव्यवहार केला होता, कायद्यामध्ये बदल झाला तर भविष्यामध्ये ज्या काही केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना येतील त्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना सहभाग करून घेता येऊ शकतो हे डॉ. खुराणा यांना पटवून दिल्यानंतर त्यांनी सुद्धा याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली व लवकरच याबाबतीत देशभरातील सर्व कौन्सिलच्या सदस्या समवेत दिल्लीमध्ये बैठकीचे आयोजन करू असे सांगितले.







