*अल कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरी ठार*
नवी दिल्ली : अमेरिकेने काबुलमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी ठार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बातमीला दुजोरा दिला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाचा ताबा घेतला. जवाहिरीवर 24 मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी झालेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झाला.जवाहिरीच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, आता न्याय झाला. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणारच.माहितीनुसार, आता अल कायदाचा नवा म्होरक्या अल-आदेल असेल.







