विषमज्वर (टायफॉइड फिवर) आणि होमिओपॅथिक उपचार….. होमिओपॅथी तज्ञ डॉ. योगिता पवार…
विषमज्वर (टायफॉईड फेवर) हा साल्मोनेला टायफी या जंतूंमुळे होणारा तीव्र सांसर्गिक आजार आहे.कशामुळे होतो…..पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे …स्वच्छतेच्या अभावामुळे…उघड्या वरील दुषित अन्न पदार्थ खाल्ल्याने..विषमज्वराची लक्षणे…3-4 आठवडे सतत ताप येणे.अशक्तपणा जाणवणे.बारीक थंडी वाजून ताप येणे.पोटदुखी, डोकेदुखी,सांधेदुखी होणे.उलट्या व मळमळ होणे..दुसऱ्या आठवड्यात छातीवर व पोटावर लालसर मोती सदृश्य पुरळ येणे. इ.लक्षणे असल्यास प्रयोगशाळेत जाऊन विडाल टेस्ट ( Widal Test) करून खात्री करून घ्यावी…विषमज्वरासाठी (टायफॉइड साठी) होमिओपॅथिक औषधोपचार पुढीलप्रमाणे…1. अर्सेनिक अल्बम…अतिसार, फूड पाॅयझनिंग,काॅलरा, यकृताच्या तक्रारी, खराब अन्न, पालेभाज्या,फळे यातून जंतूसंसर्ग होतो..लक्षणे.. पाण्यासारख्या उलट्या व जुलाब, मळमळणे,जीभ लालसर व कोरडी होते.तोंडाची लाही होते. पूर्ण शरीराची आग आग होते. उग्र वास सहन होत नाही. हातपाय गार पडतात. तहान खूप असूनही रुग्ण घोटभर पाणी पिऊ शकत नाही. पहाटे तीनच्या सुमारास दररोज ताप येतो असे चक्र चालू असते, रुग्ण बैचेन असतो,अशी लक्षणे असल्यास आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथिक औषध द्यावे.2.बेलाडोना.. रुग्णांस प्रचंड प्रमाणात ताप असतो, तापामध्ये रुग्ण बरळतो, ताप असूनही पाणी पिण्याची इच्छा होत नाही. भूक मंदावते, अधून मधून पोठ दुखते, पायाचे तळवे बर्फासारखे थंड पडतात, परंतु पुर्ण अंग उष्ण असते. तीव्र डोकेदुखी असते. रुग्ण आजाराची चिंता करत नाही, जास्त त्रास झाल्यावरच लक्ष देतो. अश्या प्रकारची लक्षणे दिसल्यास बेलाडोना हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते..3. ब्रायोनिया अल्बा….डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधे दुखी थोडीशी हालचाल केल्यावर वाढते.जीभ, ओठ कोरडी पडते, जिभेवर पांढरा थर जमा होतो. तापामध्ये भरपूर तहान लागते. खूप पाणी एकदम प्यावेसे वाटते.तापामध्ये हृदयाचे ठोके जोरजोरात वाढतात.भुक व चव अजिबात नसते , आजारपणात सुद्धा रुग्ण पैशाचा विचार करतो अशी लक्षणे दिसल्यास हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते..4.बॅप्टीसिया टिंकटोरिया..तापामध्ये भूक लागत नाही, पण पोट रिकामे आहे असे वाटते. तापामध्ये रुग्णांस ग्लानी असते पण झोप लागत नाही. जीभ मध्यभागी कोरडी व तपकिरी रंगाची असते तर कडेला काटेरी फोड असतात.ताप डोक्यात जाऊन भास होऊ लागतात ही लक्षणे दिसल्यास बॅप्टीसिया टिंकटोरिया हे होमिओपॅथिक औषध वापरावे..5.जल्सेमियम..तापामध्ये रुग्णांस खूप अशक्तपणा व थकवा जाणवत असतो.झोपून रहावेसे वाटते.हातपाय थंड पडतात.तहान लागत नाही, चक्कर येते.रुग्ण सतत ग्लानी मध्ये राहतो, झोपेत असंबद्ध बडबड करतो.अशी लक्षणे दिसल्यास जल्सेमियम हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते..याशिवाय चायना, रस स्टॉक्स,डल्कॅमारा, फॉस्फरिक ऍसिड सल्फर,नक्स ओमिका इ. होमिओपॅथिक औषधे विषमज्वर आजारांमध्ये गुणकारी ठरतात.. प्रतिबंधात्मक उपाय ….हात स्वच्छ गरम पाण्याने व साबणाने धुवावेत.पिण्याचे पाणी उकळून व गाळून गार केलेले प्यावे.फळे , पालेभाज्या स्वच्छ धुवून वापराव्यात.मासांहार टाळावा.अन्न ताजे व शक्यतो गरम असतानाच खावे..उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत.होमिओपॅथिक औषधे ही रुग्णाच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करतात, त्यामुळे मनावरील ताण कमी होवून प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढते.तसेच होमिओपॅथिक औषधांचा रुग्णावर व शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, म्हणून विषमज्वर (टायफॉइड) आजारांवर होमिओपॅथिक औषधोपचार उपयुक्त ठरतात.सदर औषधोपचार तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.
डॉ.योगिता पवार बी.एच.एम.एस. होमिओपॅथिक तज्ञ. आयुष्या होमिओपॅथिक क्लिनिक, उमाळवाड जयसिंगपूर कोल्हापूर







