काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तब्बल 200पोती तांदूळ पकडला.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस फुलेनगर येथे अकलूज येथील निर्भया पथकाचे पोलीस नाईक अनिल शिंदे हे साडेसहाच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना एका आयशर टेम्पो (क्रमांक एम एच बारा पी 26 53) हा रस्त्याने जात असताना त्याचा संशय आल्याने सदर टेम्पो अडवून टेम्पोतील माल पाहिला असता 50 किलो वजनाचे पांढऱ्या रंगाच्या 200 पोत्यामध्ये रेशनचा तांदूळ असल्याचे लक्षात आले. वाहन चालक यशवंत भीमराव पिसे राहणार वाडी नंबर दोन माळशिरस याने सदरचा माल हा फुलेनगर येथील अशोक शंकर वाघमोडे यांच्या खाजगी गोडाऊन मधून घेऊन इंदापूर येथील सोनाई पशु खाद्य येथे घेऊन चाललो असल्याचे सांगितले.सदरचा तांदूळ हा रेशनचाच असल्याची खात्री झाल्याने निर्भया पथकाचे पोलीस नाईक शिंदे यांनी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना कळविले. त्यानंतर तहसीलदार यांनी पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर व पुरवठा अव्वल कारकून चंद्रशेखर लोखंडे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात लावलेल्या आयशर टेम्पोतील मालाची पाहणी केली असता, सदरचा तांदूळ हा रेशन दुकानातील असल्याची खात्री पटल्याने पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर यांनी अशोक वाघमोडे व यशवंत पिसे दोघे राहणार माळशिरस यांचे विरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा स 1955 चे कलम तीन व सात प्रमाणे फिर्याद दिली. आहे माळशिरस फुलेनगर येथील अशोक शंकर वाघमोडे यांनी खाजगी गोडाऊन तयार केले असून, तो माळशिरस येथील काही रेशन चालकांना हाताशी धरून माल गोळा करून चोर बाजाराने विक्री करण्याचा बऱ्याच वर्षापासून व्यवसाय सुरू आहे. ही एक झलक असून याची पाळेमुळे खोलवर असण्याची शक्यता आहे, यात शासकीय अधिकारी खाल पासून वर पर्यंत सर्वांची साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.यात संबंधीत अधिकारी असतील तर त्यांची निःपक्षपाती चौकशी होणार का? ज्या रेशन दुकानातून हा माल आणला आहे. त्या रेशन दुकानाचा परवाना रद्द होणार का?माळशिरस तालुक्यात गोरगरीब नागरिकांना मिळणाऱ्या रेशन चा माल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विकणाऱ्या रेशन माफियाची मोठी टोळी सक्रिय असून, इतर माफिया वर देखील कारवाई व्हावी. तसेच ज्या रेशन दुकानातून हा माल उचलला जातो. त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.अशा प्रकारे जनतेमधून बोललं जातंय.यातूनच अशोक वाघमोडे यांनी फार मोठी मालमत्ता गोळा केली आहे. वरील सर्व प्रकरणाची तहसीलदार यांनी चौकशी करून मालमत्तेची ही चौकशी करावी अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.









