*अकलूजच्या डॉ. श्रद्धा जवंजाळ पुणे येथे पुरस्काराने सन्मानित*कशिश प्रोडक्शन व पुणेकर प्रतू फाउंडेशनच्या वतीने सन्मानित
अकलूज: सामाजिक क्षेत्रात उत्तुंग आणि भरीव कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अकलूज येथील डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना पुणे या ठिकाणी “ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया” हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने डॉ. श्रद्धा जवंजाळ यांचे वरती सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.कशिश प्रोडक्शन आणि पुणेकर प्रतु फाउंडेशन प्रस्तुत यांच्या वतीने 19 जुलै रोजी पुणे येथे सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध चित्रपटे व धारावाहिकेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेते यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये ऋषिकेश जोशी, रुचिरा जाधव, माधवी नेमकर, डॉ. उत्कर्ष शिंदे, तेजस बर्वे, सुनील गोडबोले, सुरभी हांडे, सोनाली पाटील,वैभव जाधव, मिरा जगन्नाथ, हार्दिक जोशी, यांचा समावेश आहे.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंब यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकारी, क्रीडा, आणि सांस्कृतिक क्षेत्रात असणारे भरीव योगदानामुळे सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून अकलूज गावचा ठसा उमटला आहे. या गावात अनेक विविध सामाजिक संघटना, विविध संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असताना दिसत आहेत.इथे प्रत्येक जण सामाजिक कार्याला महत्त्व देत आहेत अशातच अकलूज मधील समाज विकासाबद्दलच असणारी आत्मीयता व समाज हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुसंस्कृत आणि उत्कृष्ट विचारसरणी असणाऱ्या डॉ. श्रद्धा जवंजाळ या गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर असताना दिसत आहेत. एच आय व्ही रुग्णापासून ते कोरोना पर्यंत रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना पहिल्या टप्प्यामधील रुग्णांसाठी डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी 700 ते 800 नर्सिंग टॉप विनामूल्य कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी खाजगी रुग्णालयात दिला होता. तर सतत जि प शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप करणे,विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणे अशा विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन कशिश प्रोडक्शन व पुणेकर प्रतू फाउंडेशनच्या वतीने डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना सन्मानित केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.







