*मुद्रा अंतर्गत कर्ज घेणा-यास सहकार्य करू.विश्वास मुलगीर*
संग्रामनगर ता.३० (प्रतिनिधी)बँक ऑफ इंडिया माळेवाडी-अकलूज शाखेने आतापर्यंत मुद्रा अंतर्गत अनेक प्रकरणे केली असून आतापर्यंत सुमारे 40 लाखाचे कर्ज वाटप केले आहे.या पुढे ही असेच कर्ज वाटप केले जाणार असून व्यवसायीकांनी त्याचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे मत शाखा व्यवस्थापक विश्वास मुलगीर यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया माळेवाडी-अकलूज शाखेने मुद्रा अंतर्गत केदार संजय लोहकरे या सुशिक्षितास दोन लाखाचे कर्ज दिले या कर्जातून घेतलेल्या कॅमेराचे पूजन शाखा व्यवस्थापक विश्वास रमेशराव मुलगीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी कर्ज व्यवस्थापक रवी तेजा,सुरज माने,बजरंग काळे,भुषण नेर्लेकर,कल्याण राज,ओमकार बिराजदार,धनंजय जाधव,ओमकार बोत्रे,अनिल एकतपुरे या बँकेचे कर्मचार्यांसह डाॅ.बाळासाहेब मुळीक, प्रा.आबासाहेब थीटे,प्रा.लक्ष्मण निंबाळकर,प्रा.अरविंद वाघमोडे आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात सुरज माने यांनी मुद्राअंतर्गत दोन लाखाच्या आतील कर्ज घेतल्यास त्यास जामीनदार व इतर ज्यादा कागदपत्रांची गरज नसते. व्याजदरही कमी असतो.हे कर्ज छोट्या व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून नियमित कर्ज फेडणाऱ्या व्यवसायिकांनी याचा फायदा घ्यावा. दोन लाखांपुढील कर्जासाठी मात्र काही अटी असल्या तरी बँकेकडून त्या कर्ज घेणाऱ्या सर्वांना सहकार्य केले जाते.आभार संजय लोहकरे यांनी मानले.










