*स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी**काॅपर वायरचे दुकान फोडण-या गुन्हेगार टोळीच्या आवळल्या मुसक्या**११ घरफोडी चोरींच्या गुन्हयांची उकलक**गुन्हा करण्यासाठी वापरलेली ०१ मोटार सायकल व ०१ बुलेरो पीकअप वाहनासह, एकूण १२,२६,७४२ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.* सोलापूर (प्रतिनिधी )दिनांक ०९/०६/२०२२ ते दिनांक ११/०६/२०२२ रोजी सकाळी ०४:०० वा चे दरम्यान साई कृषीसेवा केंद्र मौजे शेलगांव वांगी ता. करमाळा येथील दुकानांची लोखंडी शटर उचकटून आतमध्ये प्रवेष करून, सबमर्शिबल मोटारीचे ४ काॅपर केबल बन्डल,१ लॅपटाॅप, लहान काॅपर बन्डल, २ मोबाईल असा एकूण १,०५,८०० रू. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दामुन व लबाडीने घरफोडी चोरीकरून नेले म्हणून राहूल तुकाराम यादव,वय २७ वर्ष, रा. वांगी नंबर २ ता. करमाळा यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने *करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं. 444/2022 भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.* सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये *मागील काही महिन्यापसून नातेपुते, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर, सांगोला, वेळापूर, कुर्डूवाडी, मोहोळ इत्यादी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये काॅपर वायरचे दुकानाचे शटर उचकटून काॅपर वायर व मोटार चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा.पोलीस अधीक्षक, श्रीमती. तेजस्वी सातपुते (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. हिम्मत जाधव, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, यांना काॅपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले यांचे पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.**सहा.पोलीस निरीक्षक, अनिल सनगल्ले व त्यांचे पथक* सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, *सवतगव्हाण ता. माळशिरस व अकलुज शहरामध्ये काॅपर वायरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची टोळी कार्यरत असून ते गुन्हे करण्यासाठी अकलुज शहरातील पीकअप वाहनाचा वापर करत असल्याबाबत माहिती मिळाली.* सदर गुन्हयाचे तपासकामी पथक अकलुज भागात असताना, टोळीतील एक सदस्य अकलुज शहरातील जुना बसस्टॅन्ड समोरील चहा टपरीवर थांबला असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून तात्काळ त्याठिकाणी जावून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याने सांगितले की, *त्याने त्याचे इतर सवतगव्हाण येथील साथीदार यांनी मिळून मागील काही महिन्यांपासून नातेपुते, करमाळा, टेंभूर्णी, पंढरपूर, सांगोला, वेळापूर, कुर्डूवाडी, मोहोळ इत्यादी ठिकाणी रात्रीचे वेळी साथीदारासह वाहनांमध्ये जावून काॅपर वायरचे दुकानाचे शटरचे कुलपे व शटर उचकटून दुकानातील दुकानातील काॅपर वायरचे केबल बन्डल व काॅपर वायर, मोटार इत्यादी साहित्याची चोरी केल्याचे सांगितले आहे. त्यावरून इतर साथीदारांचा शोध घेत असताना, गुन्हयात वापरलेले वाहन व त्याचा साथीदार या दोघांची माहिती काढून त्यांना ही गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले आहे. *त्यांचेकडून एकूण ५३० किलो वजनाचे काॅपर वायर, १ मोटार सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले पीकअप बुलेरो वाहन असा एकूण १२,२६,७४२ रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.* *सदर आरोपीतांकडे तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांचेकडून खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.*१ ) करमाळा ४४२/२०२२ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे२) करमाळा ४२९/2022 भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे३) टेंभूर्णी ३१३/२०२२ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे४) कुर्डूवाडी ३०७/२०२२ भा.द.वि.संक 461, 380 प्रमाणे५) वेळापूर १२८/२०२२ भादविसंक 457, 380 प्रमाणे६) पंढरपूर शहर ७३३/2022 भादविसंक 457, 380 प्रमाणे७) मोहोळ ४७७/२०२२ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे८) नातेपुते ३९८/२०२१ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे९) नातेपुते ३७५/२०२१ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे१०) नातेपुते १६५/२०२२ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे११) सांगोला ३७७/२०२२ भा.द.वि.संक 457, 380 प्रमाणे*सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते (भा.पो.से.), मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल सनगल्ले, पो.स.ई. शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, शिवाजी घोळवे, प्रकाश कारटकर, मनोहर माने व करमाळा पोलीस ठाणेचे तपासिक अंमलदार चेतन पाटील, अकलुज पोलीस ठाणेचे सुहास क्षिरसागर यांनी बजावली आहे.*







