अकलूजमध्ये साजरा होणार स्वातंत्र्याचा भव्य -दिव्य अमृतमहोत्सव. नागरिकांनी सहभागी होण्याचे जयसिंह मोहिते पाटील यांचे आवाहन
अकलूज (प्रतिनिधी )भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक / क्रांतीकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यासाठी जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, चेअरमन, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलुज यांचे उपस्थितीत कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉल संग्रामनगर येथे 26जुलै रोजी उपक्रम नियोजनाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अकलूज परिसरात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.स्वातंत्र्यानंतर तालुक्यातील लोकांमध्ये देश प्रेमाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी अकलुजच्या ग्रामस्थांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. स्वातंत्र्याच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुर्ततेनिमित्त तालुक्यातील सर्व सहकारी संस्था, ग्रामस्थ यांच्या सहभागातून दिनांक १४/०८/१९९७ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला अकलुज गावातून रात्री भव्य मशाल फेरी काढून, विजय चौक, अकलूज येथे ध्वरजारोहणानी स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आला.तसेच १५/०८/१९९७ रोजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर अकलुज परिसरातील सर्व शाखांतील विद्यार्थ्याच्या वतीने मानवंदना, संचलन व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्वांमध्ये देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवले.१२ व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ल्याचे नुतणीकरण व सुशोभिकरण करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासीक कतृत्वाचा तरुणांच्या अंतकरणात ठसा बिंबविण्यासाठी भव्य अशा शाही मिरवणुकीने या शिवसृष्टीचा उदघाटन सोहळा १६ जुन २००८ रोजी पार पडला. २६ जानेवारी २०१३ रोजी भारताचा ६४ वा प्रजासत्ताक दिन महावीर पथ, अकलुज येथे दिमाखदार संचलनाने सादर करुन तसेच सांस्कृतीक कार्यक्रमांच्या सादरी करणाने दिल्लीच्या राजपथावरील कार्यक्रमाची आठवण करुन देणारा हा कार्यक्रम माळशिरस तालुक्यातील सर्व नागरीकांना अनुभवास मिळाला. २६ जानेवारी २०१४ रोजी अकलुज परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रीत संचलन व कवायत विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल, अकलुज येथे एकत्रीत घेऊन सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची उर्मी जागृत केली. 26 जानेवारी २०१७ रोजी भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा महावीर पथ, अकलुज येथे भव्य तिरंगा उभारून एन.सी.सी., स्काऊट गाईड, आर.एस.पी. या सर्व विद्यार्थ्यांचे संचलन सादर करुन तसेच सैन्यदल, सांस्कृतीक, मनोरंजन यांच्या विविध प्रतिकृती सादर करुन भारतीय सैन्यदलाची गौरव गाथा नागरीकांना अनुभवता आली. आपल्या तालुक्याची ही राष्ट्रप्रेमाची गौरवशाली परंपरा वृध्दींगत करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशाच दिमाखदार पध्दतीने साजरा ‘करण्यासाठी या सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणार असलेल्या ,”हर घर तिरंगा ” हा उपक्रम राबविण्यासाठी जयसिंह ( बाळदादा) मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस .धैर्यशील मोहिते पाटील. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील .प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा .स्वरुपाराणी ( दिदिसाहेब ) मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकी मध्ये शहरात येत्या १४ आॕगस्टला न भूतो न भविष्यती असा” हर घर तिरंगा “हा उपक्रम राबविला जाणार असून प्रभातफेरी काढण्यात येणार असून अकलूज परिसरातील लहान मुले, नागरिक, महिला, आबाल वृद्ध पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होणार आहेत.गावातून सर्व जिवंत देखाव्यासह भव्य अशा प्रमाणात मुख्य चौकातून मिरवणूक काढण्याचा संकल्प केला असुन, नागरिकांना आवाहन करताना जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील , म्हणाले की आत्तापर्यंत आपण मोठं मोठे सांस्कृतिक.शैक्षणीक उपक्रम राबविले.परंतु हा उपक्रम देशासाठी व देशातील प्रत्येकासाठी देशप्रेम जागृत करण्यासाठी “हर घर तिरंगा ” हा उपक्रम राबविणार आहे.हा उपक्रम देशाच्या नेतृत्वाने दखल घेण्यासारखा व दिल्लीतील परेडच्या धर्तीवर घेणार असुन या मध्ये बहुसंख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज.. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना –शंकरनगर. शिवरत्न शिक्षण संस्था. शिवामृत दुध संघ.व विविध सामाजिक संघटना व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभाग घेणार असुन हा कार्यक्रम पाहण्यासाठी व यात स्वंयस्फूर्तीने सहभागी होण्याचे अकलूज व परिसरातील नागरिकांना जयसिंह मोहिते पाटील यांनी आवाहन केले. आपले मनोगत व्यक्त करताना स्वरुपाराणी ( दिदिसाहेब ) मोहिते पाटील यांनी जमलेल्या लोकांच्या मनातील या उपक्रमाविषयीच्या भावना जाणुन घेतल्या .सदर कार्यक्रम हा अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे होणार असून यावेळी 100फुटीचा तिरंगा फडकविण्यात येणार आहे.धैर्यशील मोहिते पाटील व संग्राम सिंह मोहिते पाटील यांनी हा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य असा संपन्न करण्यासाठी प्रत्येक अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार व जयसिंह मोहिते पाटील यांच्या मनातील हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवून देशात दखल घेण्यासारखा कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.. यावेळी अकलूज चे माजी सरपंच .किशोरसिंह माने पाटील,तहसीलदार जगदीश निंबाळकर .अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, बी. डी. ओ विनायक गुळवे,गटशिक्षणअधिकारी धनंजय देशमुख, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका,कर्मचारी शिक्षकवर्ग, पालक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .










