डेंग्यू आणि होमिओपॅथी..
..उन्हाळा संपला की सुरू होतो पावसाळा. पावसाळा म्हणजे विषाणूंचे माहेरघर. या दिवसात कमी सूर्यप्रकाश व दमट हवामान यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन रोगांची लागण होण्यास सुरुवात होते.मधुमेह,उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव , रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना विषाणूंचा संसर्ग होण्यास मदत होते .ताप येणे,थंडी वाजून येणे ,अशक्तपणा सांधेदुखी, पायाला गोळे येणे ,चक्कर येणे, झोपून राहावेसे वाटणे ,भूक न लागणे, अंगाला खाज येणे इ.लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या रक्ताची तपासणी करून त्यातील पांढऱ्या पेशींची तसेच प्लेटलेटचे प्रमाण कमी आढळून आल्यास नक्कीच समजावे याला डेंग्यू अथवा मलेरियाची लागण झाली आहे, त्यावर खात्रीशीर माहितीसाठी” रॅपिड मलेरिया टेस्ट” आणि डेंग्यूची “आईजीजी,आयजी एम,एनएस 1″तपासणी करून आजारावर शिक्कामोर्तब करावे .कधी कधी डेंग्यू, चिकनगुण्याच्या चाचण्या निगेटिव्ह येतात.रक्तातील संधिवाताची केली जाणारी इएसआर (ESR) आणि सीआरपी (CRP) या चाचण्या पॉझिटिव्ह येतात .”एडिस इजिप्ती “नावाचा डास चावल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना डेंग्यू हा आजार होतो. या आजाराची लक्षणे वर दिलेली आहेत. डेंगू होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल…- भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.- ताजी फळे खावीत.- पुरेसा आहार घ्यावा.- शिळे अन्न खाऊ नये.- उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. – औषधोपचारासह विश्रांती घ्यावी. – – – मच्छरदाणीचा वापर करावा.- संसर्ग झालेल्या रुग्णाने गर्दीत जाणे टाळावे.होमिओपॅथिक औषधोपचार चांगल्या तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास नक्कीच डेंगू पासून मुक्ती मिळण्यास मदत होते.होमिओपॅथिक औषधोपचार खालीलप्रमाणे..1) ईपिटोरीयम परफोलिटम…हाडांना प्रचंड वेदना होतात ,स्नायूंना अशक्तपणा जाणवतो , स्नायू दुखतात. रुग्ण बैचेन असतो. मळमळ व थंडी सहन होत नाही. उलटी झाल्यावर व घाम आल्यावर रुग्णास बरे वाटते. 2.रस टॉक्स.. स्नायूंना सूज येते,आखडल्यासारखे होऊन वेदना होतात. परंतु हालचाल केल्यावर बरे वाटते, थंड हवा,दमट वातावरण. थंडीच्या मुळे,मुरगळल्यामुळे, अति श्रमामुळे त्रास होतो. गरम पाण्याच्या अंघोळीमुळे, सतत चालल्यामुळे दुखणाऱ्या भागास दाबल्यावर बरे वाटते.काळजी करणारा, मदतहीन,अतिशय दुःखी स्वभावाचा,योग्य व मोजके बोलणारा, घाबरट, विसराळू, गोंधळून जाणारा, अशा स्वभावाचा व्यक्ती असेल तर त्याला रस टॉक्स हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते. 3. जलसेमियम… थंडी वाजून ताप येतो. हातपाय थंड पडतात. तहान लागत नाही. तापाबरोबर अंग थरथर कापते. तापामध्ये दृष्टीत बिघाड होतो,रुग्णाला मंदपणा,भोवळेपणा, डुलकी लागते, शांतपणे झोपावे असे वाटते. स्नायूमध्ये शिथिलता येते. आजारपणात रुग्ण बैचेन होतो. घाम आल्यावर, पुष्कळ लघवी झाल्यावर,हालचाल केल्यावर जलसेमियम रुग्णांना बरे वाटते.. 3. कॅरीका पपया… डेंग्यूच्या आजारामध्ये रुग्णांच्या प्लेटलेटचे प्रमाण हे कमी होत असते, यासाठी मूळ मात्रांमध्ये कॅरीका पपया या औषधाचे 20 – 20 थेंब दिवसातून चार वेळा घेतल्यास निश्चितपणे प्लेटलेट्स वाढतात. डेंग्यूमध्ये अतिशय गुणकारी असे हे औषध आहे. 5) ब्रायोनिया अल्बा.. पूर्ण अंगदुखी,भरपूर पाणी प्यावेसे वाटते, थंडी बरोबर ताप येतो, चेहरा लाल होतो, उष्णतेमुळे त्रास होतो.ताप कमी होत नाही. तेलकट घाम येतो, चालल्यावर त्रास होतो,विश्रांती घेतल्यावर बरे वाटते. दुखणाऱ्या भागावर झोपल्यावर बरे वाटते. मोकळ्या हवेत फिरावेसे वाटते.अशी लक्षणे असल्यासब्रोयोनिया अल्बा हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते. या औषधाबरोबरच आर्सेनिक अल्बम, बेलाडोना ,नक्स ओमिका, चाइना, कल्केरिया कार्ब इत्यादी अनेक औषधे तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास नक्कीच डेंगू पासून आपणास मुक्ती मिळते.
डॉ. बाळकृष्ण निवृत्तीराव गायकवाड . एमडी (होमिओपॅथी),पुणे द्वारका होमिओ क्लिनिक अँड रिसर्च सेंटर,मोतीराम कॉम्प्लेक्स, पौड रोड मेट्रो स्टेशन समोर कोथरूड पुणे 389921939191







