*सर्किट बेंच सहा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच मुख्यन्यायमूर्ती यांची भेट घेतो. मुख्यमंत्री* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून लवकर सर्किट बेंच करण्याची केली मागणी.*
कोल्हापूर दि.२५ (केदार लोहकरे याजकडून)आज कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूर विमान तळावरती राजेश क्षिरसागर यांचे पुढाकाराने भेट घेऊन लवकरच सर्किट बेंच स्थापने बाबत निवेदन देण्यात आले. माननीय मुख्यन्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी खंडपीठ कृती समितीस दिनांक 19/7/2022 रोजी पत्र पाठवून मुख्यमंत्री यांची भेट झालेनंतर सर्किट बेंचबाबत निर्णय घेतला जाईल असे कळविले होते.त्या पार्श्व भूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न अंतिम टप्यात आलेला असून केवळ मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे मुख्यन्यायमूर्ती यांनी कळविले आहे त्या पत्रातील मजकूर बार कौन्सिल मेंबर अॅड.विवेक घाटगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे निदर्शनास आणून दिला.तसेच सदरचा सर्किट बेंचचा प्रश्न सहा जिल्ह्यातील सर्व सामान्य पक्षकारांशी निगडितशअसून त्यामध्ये सातारा हा आपलाही जिल्हा आहे असे खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न अग्रक्रमाने निर्णयाप्रत नेहण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे राजेश क्षीरसागर यांनी या प्रश्नी ऑगस्टचा पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री यांचे समवेत मिटिंग लावणार असलेचे सांगितले. या शिष्टमंडळामध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड.महादेवराव आडगुळे,कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष गिरीश खडके बार कौन्सिल सदस्य अॅड.विवेक घाटगे सेक्रेटरी अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख,माजी अध्यक्ष अॅड.प्रशांत चिटणीस अॅड.प्रकाश मोरे यांचा समावेश होता.







