*अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने वस्तीगृहीच्या विद्यार्थींनीसाठी बस सेवेचा शुभारंभ.*
संग्रामनगर दि.२५ (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला वस्तीगृहाच्या विद्यार्थिनींसाठी आज बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शंकरराव मोहिते महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र पदवी महाविद्यालय,औषधनिर्माण शास्त्र पदविका महाविद्यालय यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी वसतिगृह ते महाविद्यालय जाण्या येण्यासाठी बस सेवेचा शुभारंभ केल्याची माहिती वसतिगृहाच्या अधिक्षिका श्रीमती अनिता निंबाळकर यांनी दिली.सदर बस सुविधा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बस सेवा सुरू करण्यात आली असून याचा लाभ वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थिनींना होणार आहे. याप्रसंगी वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती अनिता निंबाळकर,सोनाली होनगुटे,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल सुर्वे,कार्यालयीन अधिक्षक विजयकुमार कोळी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.








