*केंद्र सरकारकडून अखेर अनेक खाद्यपदार्थावरील जीएसटी मागे*
नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमाणात महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असतानाच केंद्र सरकारने दही, लस्सी, तांदूळ यासह अनेक खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्यामुळे अखेर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागच्या महिन्यात जीएसटी परिषदेत पार पडली होती. या बैठकीत खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 18 जुलैपासून झाली होती. त्यामुळे अनेक खाद्यपदार्थ महाग झाले होते. दरम्यान, आधीच महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. यावर विचार करत केंद्र सरकारने आता खुल्या धाण्यावरील जीएसटी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.







