*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस बिलाची उर्वरीत एफ.आर.पी.ची रक्कम बॅकेत जमा.*
संग्रामनगर दि.१४ (केदार लोहकरे याजकडून)शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सिझन २०२१-२२ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास ऊस उत्पादक सभासद व ऊस पुरवठादार यांना रक्कम रूपये १८८/- प्रमाणे ऊस बिलाची उर्वरीत एफ.आर.पी. ची रक्कम संबंधीत ऊस पुरवठादार यांचे बॅक खातेवर वर्ग करण्यात आली आसल्याचे कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी कारखाना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. कारखान्यातचे मार्गदर्शन संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस पुरवठादार शेतकरी यांचे सिझन २०२१-२२ मध्ये गळीतास आलेल्या १३ लाख २४ हजार २२९ मे.टन ऊसास एफ.आर.पी. प्रमाणे रक्कम रूपये २४८८/- ऊस दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्यानुसार या पुर्वी मे.टन रूपये २३००/- प्रमाणे रक्कम ऊस पुरवठादार यांना अदा केली आहे.उर्वरीत एफ.आर.पी.ची प्रती मे.टन रक्कम रूपये १८८/- प्रमाणे त्यांच्या खात्यावर वर्ग करणेत आली असले बाबत पत्रकारांना माहिती देताना कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने सिझन २०२२-२३ मध्ये सुमारे १६ लाख मे टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रती दिवस ८५०० मे.टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्र प्रणाली कार्यान्वित केली आहे.तरी येणारा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी कारखान्यास ऊस पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड.प्रकाशराव पाटील,संचालक नामदेव ठवरे,लक्ष्मण शिंदे,सुरेश पाटील,धनंजय चव्हाण,शंकरराव माने-देशमुख,विजय माने-देशमुख,विजयकुमार पवार,रावसाहेब मगर,मिलिंद कुलकर्णी,राजेंद्र मोहिते,महादेव घाडगे,विश्वास काळकुटे,चांगदेव घोगरे,भारत फुले,भिमराव काळे,बाबूराव पताळे,सतिश शेंडगे,संचालिका सौ.माधुरी लोंढे,श्रीमती कमल जोरवर,श्रीमती कुमाबाई क्षीरसागर,कामगार संचालक मोहीत इनामदार व इतर मान्यवर धनंजय दुपडे,विनायक केचे,अनिलराव कोकाटे,रामचंद्र ठवरे,नितीन निंबाळकर,चंद्रशेखर दुरापे,मारुती घोडके,अमरसिंह माने-देशमुख,नामदेव चव्हाण,रणजीत रणनवरे तसेच खाते प्रमुख,कामगार युनियनचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ.आर.पी.ची उर्वरीत रक्कम रूपये १८८/- प्रती टन अदा केल्याने ऊस उत्पादक सभासदामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे







