पावसाळ्यातील आजार आणि होमिओपॅथिक उपचार….. डॉ. योगिता पवार (होमिओपॅथी तज्ञ)
पावसाळा आला की आनंद होतो खरा, परंतु त्याच वेळेस सर्वांच्या छातीत घस्स होते ते पावसाळी आजारांच्या भीतीने.पावसाळा सुरू झाला की,तापमानात सतत बदल होतात,हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो, सूर्य ढगाआड जातो, त्यामुळे उन्हाने जंतूंचा नाश होणे बंद होते,परिणामी आपलीही प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते आणि या सगळ्यातून पुढे सरसावतात ते म्हणजे सर्दी ,खोकला, डायरिया, डिसेंट्री,घसा दुखणे, अतिसार, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया,चिकन गुण्या,काविळीची साथ इ. सारखे आजार… पावसाळ्यातील आजारावर नियंत्रण ठेवायचे असेल तर1) समाजाचे आरोग्य शिक्षण आवश्यक आहे.2) आजाराची लक्षणे दिसल्यास घरी वेळ न काढता होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणे..3) गरज भासल्यास वेळच्यावेळी रक्त, लघवीच्या तपासण्या करून घेणे.4) घाबरून न जाता शांतपणे व्यवस्थित योग्य वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे आहे.या गोष्टी लक्षात ठेवाव्या …1.दैनंदिन आहारामध्ये पचनाला हलके अन्नपदार्थ घ्यावेत 2.सांधेदुखी,वातव्याधी टाळण्यासाठी नियमित व्यायाम,योगासने करावीत.3. फ्रीजमधील अति थंड पाणी पिणे, कोल्ड्रिंक,आईस्क्रीम यामुळे भूक मंदावते व सर्दी खोकला यासारखे आजार लवकर होतात ते प्रमाण कमी करावे .4.मांसाहार टाळावा. 5.पावसाळ्यात तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न,बेकरीचे पदार्थ,साबुदाणा,मसालेदार चमचमीत अन्न, फास्टफूड आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे ते टाळावे 6.दररोज रात्री झोपताना पंधरा ते वीस काळे मनुका खाल्ल्याने पोट साफ होते.7. रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे, यामुळे वजन नियंत्रित राहते व शरीर हलके राहते अशा पद्धतीने नियमित व्यायाम व सोपे नियम पाळून आपण अनेक आजारापासून लांब राहू शकतो.. पावसाळ्यातील आजारांवर होमिओपॅथिक औषधोपचार …1.अर्सनिक अल्बम …अतिसार, फूड पॉइजनिंग, कॉलरा यकृताच्या तक्रारी,खराब अन्न, पालेभाज्या, फळे यातून सहज जंतुसंसर्ग होतो.लक्षणे.. मळमळणे, पाण्यासारख्या उलट्या व जुलाब होणे, उग्र वास सहन होत नाही, हातपाय गार पडतात. थकवा, अशक्तपणा येऊन चक्कर येते, वारंवार थोडे थोडे पाणी पिण्याची इच्छा होते. मलेरियाच्या तापात यकृताला सूज येते,रुग्ण अस्वस्थ आणि चिंता तुर असतो. सुनियोजित, व्यवस्थितपणा, अति संवेदनशील व्यक्ती आढळल्यास आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा.. 2.नक्स ओमिका …उलट्या व शौच यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर येणे,अपचन,गॅस पकडणे इ. तक्रारी होतात. अतिसाराबरोबर कावीळची लक्षणे दिसतात,सर्दी, खोकला,ताप येणे अंगदुखी,पायाला गोळे येणे,चक्कर येणे, राग सहन न होणे.अति महत्वकांक्षी,मेहनती आत्मसन्मानी, रागीट स्वभावाच्या, दुसऱ्याच्या चुका शोधणारा, उग्र वासाने त्रास होणारा तसेच थंडी सहन होत नसणे अशी लक्षणे असल्यास नक्स ओमिका या होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा.3.बॅप्टिसिया टिन्कटोरिया… टायफॉइड सारख्या रोगांमधील पोटाच्या तक्रारी,ताप इ.करिता. पोट फुगणे,वेदना होणे,अतिशय खराब वास असलेले पातळ जुलाब,रक्त पडणे. रुग्ण अतिशय अशक्त होतो, श्वासाला दुर्गंधी येते, जिभेवर वीटकरी पिवळट आवरण येते, ताप डोक्यात जाऊन भास होऊ लागतात ही लक्षणे रुग्णात दिसत असल्यास या औषधाचा वापर करावा.4.मर्क्युरीयस स्काॅर ..पोटात दुखून सतत शौचावाटे रक्त पडणे आधी लक्षणे असल्यास मक्युरिअस स्काॅर हे होमिओपॅथिक औषध गुणकारी ठरते ..5 क्युप्रम मेटालिकम..कॉलरा ,जुलाब हाता पायाला गोळे येणे, मळमळने,पोटात मुरडा येणे, वारंवार थंड पाणी पिण्याची इच्छा होणे या लक्षणात क्युप्रम मेट गुणकारी आहे.. 6.व्हेराट्रम अल्बम.. अतिसार,पोटदुखी,पायामध्ये गोळे येणे ,अत्यंत थकवा जाणवतो, घाम फुटणे, शरीर गार पडणे, पोटात पाण्याचा थेंब टिकत नाही,उलट्या होतात,अशा वेळेस व्हेराट्रम अल्बम या होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा..7. पोडोफायलम..कॉलरा, अतिसार, यकृताच्या तक्रारी, लहान मुलांना दात येताना व स्त्रियांना गर्भारपणात उद्भवणाऱ्या पोटाच्या तक्रारी, सकाळी उठल्या उठल्या जुलाब होणे, कधी झोपेत नकळत कपडे खराब होणे ,चिकट आव पडणे, खराब वास असलेले पाण्यासारखे फेस असलेले जुलाब अशी लक्षणे दिसत असल्यास आणि रुग्णाला दुधाने व आंबट फळांनी त्रास होत असेल, पालथे पोटावर झोपल्यावर आराम पडत असेल तर पोडोफाईलम या होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा.. याशिवाय लक्षण साधर्म्य नुसार अलोज सोकॉट्रिना, क्रोटन टिग, थुजा, कार्बोवेज, फॉस्फरिक ऍसिड, सल्फर इत्यादी अनेक औषधे होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास पावसाळ्यातील आजारावर चांगला इलाज करता येऊ शकतो.. प्रतिबंधात्मक उपाय…1. दूषित पाणी पिऊ नये.2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थाचे सेवन करावे. ब्रोकोली,गाजर हळद आणि आले हे पदार्थ आपली त्वचा आणि केसासह रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.3. जखम झाली असल्यास ती स्वच्छ साफ करावी.4. डासापासून स्वतःचा बचाव करावा.5. पावसामध्ये भिजू नये त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते पावसात भिजल्यास गरम पाण्याने हातपाय स्वच्छ धुऊन घ्यावेत कारण भिजलेल्या शरीरावरून, केसात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. 6.बाहेर पाऊस पडत असला तरी घरी नियमित शारीरिक व्यायाम करावा, कारण व्यायामामुळे आरोग्य उत्तम राहते.7.प्यायचे पाणी उकळून व गाळून घ्यावे.8.अन्न ताजे, शक्यतो गरम असतानाच खावे.9.परिसरात स्वच्छता ठेवावी..10.पाणी साठवून ठेवू नये.11.उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत.. पावसाळ्यात होमिओपॅथी औषधांचा अल्पकालीन व दीर्घकालीन असा दोन्ही प्रकारे चांगला उपयोग होतो शिवाय त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. होमिओपॅथिक औषधे ही रुग्णांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करतात त्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारचे वाढते म्हणूनच पावसाळ्यातील आजारावर होमिओपॅथिक उपचार उपयुक्त ठरतात. सदर होमिओपॅथिक औषधे रुग्णांनी होमिओपॅथिक तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.. डॉ. योगिता पवार (बी.एच.एम.एस.) (होमिओपॅथिक तज्ञ )आयुष्या होमिओपॅथिक क्लिनिक उमळवाड जयसिंगपूर जि. कोल्हापूर…







