अकलूज नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले.जुन्या सदस्यांना संधी मिळणार का?
अकलूज (प्रतिनिधी )आशिया खंडात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायतीचे 43दिवसाच्या साखळी उपोषणानंतर 03-08-2021रोजी नगरपरिषदेत रुपांतर झाल्यानंतर अकरा महिन्याच्या कालावधी नंतर अकलूज नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तसा शासन आदेश काढण्यात आला आहे.22-7-2022 सकाळी 11वाजले पासुन ते 28-7-2022दुपारी 2वाजे पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तर 29-7-2022रोजी अर्जाची छाननी होऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तसेच 04-08-2022रोजी दुपारी 3वाजे पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.18-08-2022रोजी सकाळी 7-30पासुन सायंकाळी 05-30पर्यंत मतदान होणार असून,19-08-2022रोजी सकाळी 10वाजले पासुन मत मोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.नगरपरिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. सदर निवडणुकी साठी प्रभाग रचना झालेली आहे. एकूण 13 प्रभागातून 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून निवडून जाणार आहेत. 50% महिला साठी आरक्षण असल्याने 13 जागांसाठी महिला उमेदवार असतील.उर्वरित जागेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गटातील 3 जागा राखीव आहेत.13प्रभाग मधून 26नगरसेवक निवडून येणार आहेत. तर 2 नगरसेवक स्वीकृत म्हणून घेतले जाणार आहेत.एकूण 28नगरसेवक असणार आहेत.नगराध्यक्ष पदाचे अद्याप आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे आरक्षण कधी जाहीर होते. याची उत्सुकता लागली असून तर्क -वितर्क लढविले जात आहेत.अकलूज ग्रामपंचायत च्या स्थापने पासुन या ग्रामपंचायत वर मोहिते पाटील यांचे निर्विवादपणे वर्चस्व राहिले आहे.त्यामुळे नव्याने होऊ घातलेल्या नगरपरिषद च्या निवडणुकीत मोहिते पाटील नगरसेवक म्हणून कोणाला संधी देणार? अकलूज ग्रामपंचायत असताना अनेक कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून संधी देण्यात आली होती. परंतु त्यांचा कार्यकाळ थोडाच होता. त्यामुळे पूर्वी ग्रामपंचायत सदस्य असलेल्याना पुन्हा संधी मिळणार का? की नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान अकलूज नगर परिषद ची पहिलीच निवडणूक असल्याने ही निवडणूक रंगतदार असणार आहे. एवढे मात्र निश्चित.अद्याप या निवडणुकी साठी उमेदवार जाहीर करण्यात आले नसले तरी अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत.विरोधी गटाने देखील पॅनल टू पॅनल साठी तयारी सुरु केली असून, अनेक अपक्ष उमेदवार देखील जोमाने तयारीला लागले आहेत.या निवडणुकीत 13प्रभाग मधून 26नगरसेवक निवडून येणार आहेत. परंतु इच्छुकांची संख्या मात्र शंभराच्या घरात आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार. अपक्ष उमेदवार किती असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्याचप्रमाणे ही पहिलीच निवडणूक असल्याने सदर निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि निवडणुकी साठी होणारा संभाव्य खर्च टाळून त्या खर्चातून विकास कामे केली जावीत.असेही काही नागरिकांमधून बोलले जात आहे.






